चार वर्षांपासून काम नाही; देश सोडणारा R. Madhavan आता शेती करतोय ?

हल्लीच एका मुलाखतीमध्ये त्यानं आपण जवळपास गेली 4 वर्षे तगडी कमाई करु शकलो नसल्याचं वक्तव्य केलं

Updated: Jun 1, 2022, 12:54 PM IST
चार वर्षांपासून काम नाही; देश सोडणारा R. Madhavan आता शेती करतोय ?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : 'सच कह रहा है दिवाना' हे गाणं आठवलं, की लगेचच डोळ्यांसमोर निरागस चेहरा असणारा अभिनेता आर माधवन (R madhavan ) उभा राहतो. मालिका विश्वातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्यानं त्याच्या अभिनयाच्या बळावर बऱ्याच वेगवेगळ्या भूमिकांना न्याय दिला. (Bollywood Actor R Madhavan house farming son)

सध्या भारतात वास्तव्यास नसणाऱ्या या अभिनेत्यानं कायमच अनेकांच्या मनावर राज्य केलं. अर्थात त्याच्या अभिनयाचा आणि देश सोडण्याचा थेट संबंध नाही. पण, त्यानं देश का सोडला हा प्रश्न मात्र कायमच चाहत्यांच्या मनात घर करताना दिसला.

माधवननं लेकाच्या प्रगतीपोटी, त्याला ऑलिम्पिकच्या प्रशिक्षणासाठी सर्व गोष्टी सुकर व्हाव्यात हा निर्णय घेत परदेशी जाण्याचा निर्णय घेतला. हल्लीच एका मुलाखतीमध्ये त्यानं आपण जवळपास गेली 4 वर्षे तगडी कमाई करु शकलो नसल्याचं वक्तव्य केलं. 

आता अचानकच त्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत जिथं तो शेती करताना दिसत आहेत. आता त्यानं अभिनय सोडून शेतीचा मार्ग निवडला का? हाच प्रश्न चाहत्यांनी विचारण्यास सुरुवात केली. 

पण, या फोटोमागची कहाणी काही औरच आहे. माधवनंचं मुंबईत आलिशान घर आहे. कोट्यवधींच्या या घरात त्यानं सुरेख अशी सजावटही केली आहे. याच घराच्या बाल्कनीमध्ये त्यानं किचन गार्डनिंगही केलं आहे. 

व्हायरल होणारे हे फोटो सध्याचे नसून काही दिवसांपूर्वीचे आहेत. जिथं माधवननं त्याच्या घरातील बाल्कनीमध्ये लावलेल्या भाज्या पाहता येत आहेत. बेडरुमसमोर असणाऱ्या लहानशा बागेतून भाज्या तोडणं, त्याच शिजवून खाणं म्हणजे त्याचं आवडीचं काम. 

असा हा अभिनेता सध्या भारतात नसला, तरीही तिथं परदेशातही तो त्याची आवड जपत असेल यात वाद नाही.