'मुझको सजा दी प्यार की..', म्हणणाऱ्या KK नं जेव्हा Salman Khan-Aishwarya Rai लाही रडवलं

पाहा तुम्हालाही रडवेल असाच हा व्हिडीओ....., फक्त व्हिडीओ नाही भावनांचा सागर...   

Updated: Jun 1, 2022, 12:19 PM IST
'मुझको सजा दी प्यार की..', म्हणणाऱ्या KK नं जेव्हा Salman Khan-Aishwarya Rai लाही रडवलं  title=

मुंबई : 'अगर मिले खुदा तो... पुछुंगा खुदाया...' आज प्रत्येकासाठी वाईट दिवस आहे, कारण प्रसिद्ध बॉलिवूड गायक केकेने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे त्याच्या प्रत्येक चाहत्याला देवाकडे 'खुदाया' विचारायचं आहे. अनेक बॉलिवूड सिनेमांना हीट गाणी देऊन त्या सिनेमात भावना टाकायचं काम केकेच्या संगीताने केलं. पण तो आवाज आज हरपला आहे. केकेने फक्त चाहत्यांना नाही, तर चक्क अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायला देखील रडवलं. 

1999 साली प्रदर्शित झालेल्या 'हम दिल दे चुके सनम..' सिनेमाने तर फक्त सलमान आणि ऐश्वर्याला नाही तर अनेकांना रडवलं. केकेने  'तडप-तडप' गाण्याला दिलेला आवाज आजही अनेकांना भावुक करतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 'हम दिल दे चुके सनम..' सिनेमातील 'तडप-तडप' गाणं सलमान आणि ऐश्वर्यावर चित्रित करण्यात आलं आहे. सिनेमातील त्या गाण्यानंतर सलमान या सिनेमामुळे अनेक रिऍलिटी शोमध्ये देखील भावुक झाला. 

सध्या सलमान आणि केकेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे व्हिडीओ पाहुन तुमच्या देखील डोळ्यात पाणी येईल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रसिद्ध बॉलिवूडमधील पार्श्वगायक केके (KK) ऊर्फ कृष्णकुमार कुन्नतचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालंय. के.के कोलकात्यातील एका कॉन्सर्टमध्ये सहभागी झाला होता. 

दरम्यान कॉन्सर्टनंतर त्याची तब्येत बिघडली आणि तो अचानक खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं मात्र तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.