Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : एका व्यक्तीमुळं इतक्या घाईत पार पडणार रणबीर-आलियाचं लग्न

रणबीर- आलियाच्या लग्नाला कोणाची हजेरी असणार ? 

Updated: Apr 5, 2022, 12:14 PM IST
Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : एका व्यक्तीमुळं इतक्या घाईत पार पडणार रणबीर-आलियाचं लग्न  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अखेर तो क्षण नजीक आलाच. अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट ही जोडी त्यांच्या प्रेमाच्या नात्याला आता नवी ओळख देण्यास सज्ज झाली आहे. (Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding )

सूत्रांच्या माहितीनुसार आलिया आणि रणबीरच्या लग्नाची तारीख काही दिवसांनी मागे घेण्यात आली आहे. 

आलियाचे आजोबा, एन. राझदान यांची प्रकृती खालावल्यामुळं आपल्या नातीचा लग्नसोहळा पाहण्याची त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचं कळतं. 

दरम्यानच्या काळात या संपूर्ण गोतावळ्यात आलिया आणि रणबीर कामात बरेच व्यग्र असणार आहेत. कथित लग्नसोहळ्यानंतर आलिया लगेचच तिच्या हॉलिवूडपटासाठी रवाना होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं आताच या लगीनघाईला वेग आला आहे. 

कोरोना काळ आता मागे सरला असून, निर्बंधही बऱ्याच अंशी मागे घेण्यात आले आहेत. ज्यामुळं या लग्नसोहळ्याचा अनेकांचीच हजेरी असण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

Alia's maternal grandfather unwell

पाहुण्यांच्या यादीत या दोघांचेही खास मित्र, अर्जुन कपूर, अयान मुखर्जी, आदित्य रॉय कपूर, दीपिका पदुकोण आणि रणवीर यांची हजेरी असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

चेंबूर येथे असणाऱ्या RK HOUSE मध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा होणार असल्याचं कळत आहे. इतकंच नव्हे, तर आलिया लग्नाआधी स्पिन्स्टर्स पार्टी आणि रणबीर बॅचलर्स पार्टीची तयारी करत आहे. 

रणबीरच्या बॅचलर्ससाठी अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर, अयान मुखर्जी यांची हजेरी हमखास असेल असं सांगण्यात येत आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x