कोण होता 'त्या' Nude फोटोंचा Photographer? फोटोशूटसाठी लागलेला वेळ पाहून व्हाल हैराण

कोणी काढले रणवीरचे Nude फोटो? 

Updated: Jul 27, 2022, 12:13 PM IST
कोण होता 'त्या' Nude फोटोंचा Photographer? फोटोशूटसाठी लागलेला वेळ पाहून व्हाल हैराण  title=
Bollywood Actor Ranveer Singh nude photos photographer

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या कोणत्या आगामी चित्रपटामुळे नव्हे, तर एका फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. आता त्याचं हे कोणतं फोटोशूट, कोणते फोटो हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. कारण आतापर्यंत तुमच्यापर्यंतही हे प्रकरण पोहोचलं असावं. (Bollywood Actor Ranveer Singh nude photos photographer)

रणवीरनं काही दिवसांपूर्वी एका मासिकासाठी फोटोशूट केलं. जिथं ते अर्धनग्न आणि नग्न Nude and Seminude रुपात दिसला. अतरंगी कपड्यांपर्यंत ठीक होतं, पण रणवीरचा हा न्यूड लूक अनेकांसाठीच अनपेक्षित होता. त्यावर तशा प्रतिक्रियाही आल्या. 

काहींनी या फोटोशूटचं कौतुक केलं, तर काहींनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली. रणवीरचा हा फोटो सध्या वादाचं कारणंही ठरला आहे. पण, तो काढण्यासाठी लागलेली मेहनत पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 

कोणी काढले रणवीरचे न्यूड फोटो? 
आशिष शाह या छायाचित्रकारानं रणवीरचे हे फोटो काढले. मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये त्याचे हे फोटो काढण्याच आले. जवळपास 3 तास हेच काम सुरु होतं. एका मुलाखतीत आशिषनं या फोटोशूटमागच्या गोष्टींचा उलगडा केला. 

रणवीर आणि माझ्यामध्ये या फोटोशूटविषयी चर्चा झाली, ज्यानंतर शेवटी आम्ही फोटो काढले. हे एका दिवसाच्या चर्चेनंतर घडलेलं नाही. पेपर या मासिकासाठी हे फोटोशूट करण्यात आलं. जिथं फिजिकलिटी दाखवली जाणं अपेक्षित होतं. आपल्याला यामध्ये विविध शारीरिक रचना दाखवायच्या होत्या, असंही आशिषनं सांगितलं. 

फोटोशूटदरम्यान रणवीरनं पूर्ण सहकार्य केल्याचं सांगत त्याला संकोचही वाटला नसल्याचंही तो म्हणाला. फोटोशूटदरम्यान आशिष आणि रणवीर एकमेकांना चांगल्या पद्धतीनं ओळखू लागले होते. त्यामुळं त्यांना कामाच अडचण आली नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ashish Shah (@ashishisshah)

फोटोंवरील वादावर प्रतिक्रिया 
सध्या फोटोंमुळे सुरु असणाऱ्या वादाविषयी सांगताना आशिषनं त्याचं मत मांडलं. 'हे सर्वकाही चांगल्या पद्धतीनं पार पडलं. पण, समाजात एक वर्ग असाही असतो ज्यांना या सर्व गोष्टी पटत नाहीत. मी त्या क्षणी जे सर्वोत्तम होतं ते टीपण्याचा प्रयत्न केला', असं म्हणत एका कलाकाराचा दृष्टीकोन त्यानं सर्वांसमोर ठेवला.