...म्हणून नेटकरी म्हणाले, 'भाऊ... जे मला माहित नाही ते सांगा'

रोहित शेट्टी दिग्दर्शित चित्रपट म्हटलं की, त्या चित्रपटामध्ये काही अफलातून साहसदृश्यं आणि....

Updated: Dec 5, 2018, 04:15 PM IST
...म्हणून नेटकरी म्हणाले, 'भाऊ... जे मला माहित नाही ते सांगा' title=

मुंबई : रोहित शेट्टी दिग्दर्शित चित्रपट म्हटलं की, त्या चित्रपटामध्ये काही अफलातून साहसदृश्यांची झलक पाहायला मिळणार हे प्रेक्षकांना ठाऊकच असतं. रोहितही चाहत्यांना कधी निराश करत नाही. अशाच काही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो पुन्हा एकदा धमाकेदार चित्रपटासह सज्ज झाला आहे. तो चित्रपट म्हणजे, रणवीर सिंगची मुख्य भूमिका असणारा, 'सिंबा'. 

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. रणवीर साकारत असलेला 'संग्राम भालेराव' या ट्रेलरमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली असंच म्हणावं लागेल. 

कोणत्याही भूमिकेत जीव ओतून ती रुपेरी पडद्यावर अगदी प्रभावीपणे उतरवण्याकडे रणवीरचा कल असतो. सध्या सिंबाचा ट्रेलर रणवीरच्या अभिनयासोबतच गाजतोय ते म्हणजे त्याच्या एका संवादामुळे.

'भाऊ जे मला माहित नाही ते सांगा.... Tell me something I dont know', हा त्याचा डायलॉग वापरत नेटकरीही त्याने विनोदी खेळी करत आहेत. हे आहेत त्यातीलच काही निवडक मीम्स. 

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंबा' या चित्रपटामध्ये रणवीर सिंगसोबतच अभिनेत्री सारा अली खान स्क्रीन शेअर करणार आहे. त्यासोबतच सोनू सुद, सुचित्रा बांदेकर, अरुण नलावडे, ही मंडळीसुद्धा या चित्रपटातून झळकणार आहेत.