Forbes India च्या लिस्टमध्ये सलमान बनला 'सुल्तान' तर...

पाहा संपूर्ण यादी 

Forbes India च्या लिस्टमध्ये सलमान बनला 'सुल्तान' तर...  title=

मुंबई : फोर्ब्स इंडियाने भारतातील सर्वात श्रीमंत कलाकारांची यादी जाहीर केली आहे. एका बाजूला बॉलिवूडचा दबंग खान या यादीत टॉपवर आहे तर तिथेच खेळाडू देखील काही मागे राहिलेले नाहीत. या यादीत क्रिकेटर विराट कोहली आणि महेंद्र सिंह धोनी देखील टॉप 5 मध्ये आहेत. 

तर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार देखील या यादीत टक्कर देत आहे. या चार कलाकारांबरोबरच सर्वात जास्त कमाई करणारी रणवीर सिंहची पत्नी दीपिका पदुकोण ही एकटी अभिनेत्री आहे. जिने टॉप 5 मध्ये आपली जागा निर्माण केली आहे. 

सलमान खान फोर्ब्स इंडिया 2018 च्या यादीतील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी असून तिसऱ्यांदा या यादीत नाव आलं आहे. 253.25 करोड रुपये कमाईसोबत सलमान खान भारतातील सर्वात श्रीमंत कलाकार आहे. 

'टायगर जिंदा है' आणि 'रेस 3' या सिनेमात सर्वाधिक कमाई करून ब्रँड इंडोर्समेंट्सने दबंग खान पहिल्या स्थानावर पोहोचलं आहे. सलमान खान पाठोपाठ 228.09 करोड रुपयांची कमाई करून क्रिकेटर विराट कोहली दुसऱ्या क्रमाकांवर पोहोचला आहे. 

विराट ऑडी, पुमा, हिरो मोटर कॉर्प, कोलगेट आणि सन फार्मा प्रोड्टसचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. तिसऱ्या क्रमांकावर अक्षय कुमार असून त्याची कमाई 185 करोड रुपये आहे. 

या यादीत चौथ्या क्रमांकावर 112.8 करोड रुपयांची कमाई करत दीपिका पदुकोण पोहोचली आहे. टॉप 5 मध्ये पोहोचणारी पहिली महिला कलाकार आहे. परवाच परदेशी सून झालेली देसी गर्ल प्रियंका चोप्राकरता ही चिंतेची बाब आहे. ती टॉप 10 यादीतून बाहेर पडली आहे.