लेकीसाठी किंग खानने लिहिली भावनिक पोस्ट

पाहा तो म्हणतोय तरी काय....

Updated: Dec 2, 2018, 09:45 AM IST
लेकीसाठी किंग खानने लिहिली भावनिक पोस्ट

मुंबई : अभिनय विश्वात आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या किंग खानची मुलगीही आता या विश्वात पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे. शाहरुख आणि त्याची मुलगी सुहाना यांच्यामध्ये असणाऱ्या नात्याविषयी काहीच वेगळं सांगण्याची गरज नाही. किंग खान नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मुलीसोबतच्या नात्याची सुरेख बाजू सर्वांसमोर ठेवत हे नातं अलगदपणे मांडतो. त्यातच आता त्याने आणखी एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. 

शाहरुखने या पोस्टच्या माध्यमातून सुहानाच्या अभिनय कौशल्याची प्रशंसा केली आहे. त्यासोबतच तिच्यासोबत काम करणाऱ्या इतरही कलाकारांचं त्याने कौतुक केलं आहे. 

लंडनमध्ये असतेवेळी सुहानाचं 'ज्युलिएट' हे नाटक पाहून भारावलेल्या किंग खानने तिच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आणि याच फोटोच्या कॅप्शनच्या माध्यमातून आपल्या लाडक्या लेकीची प्रशंसा केली. 

सुहाना येत्या काळात बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची चिन्हं असल्याचं स्पष्ट होत आहे. किंबहुना याची सुरुवातही झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच 'वोग' या मासिकाच्या एका आवृत्तीमध्ये सुहानाचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला होता.

मेऱ्यासमोर असणारा तिचा वावर आणि एकंदर त्यात असणारी सहजता पाहता पुढील काही वर्षांमध्ये तीसुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे रुपेरी पजदा गाजवणार असं म्हणायला हरकत नाही. 

सध्याच्या घडीला ती लंडनमध्ये शिक्षणासाठी गेली असून शिक्षण पूर्ण करण्याकडेच तिचा कल आहे. तिने शिक्षण पूर्ण करुन त्यानंतरच मग कलाविश्वाकडे वळावं असंच खुद्द शाहरुखलाही वाटतं.