'जिनके घर शीशे के...', कमी वयात आई होणाऱ्या आलिया भट्टविषयी बोलताच शाहिदला नेटकऱ्यांनी झापलं

Bollywood News : एखाद्या चित्रपटाच्या निमित्तानं एकमेकांसोबत दिसणाऱ्या कलाकारांमध्ये मैत्रीचे असे काही बंध तयार होतात की पाहता पाहात त्यांच्या नात्यात बरील सहतजा येते. अभिनेता शाहिद कपूर आणि आलिया भट्ट यांचं नातं त्यापैकीच एक.   

सायली पाटील | Updated: Jun 13, 2023, 11:18 AM IST
'जिनके घर शीशे के...', कमी वयात आई होणाऱ्या आलिया भट्टविषयी बोलताच शाहिदला नेटकऱ्यांनी झापलं  title=
Bollywood Actor Shahid Kapoor Expresses Shock on co actor Alia Bhatt Becoming A Mom At 29

Shahid Kapoor Alia Bhatt : बी टाऊनमध्ये चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाज एकमेकांसोबत काम करणारे अनेक कलाकार पुढे जाऊन खुप चांगले मित्र-मैत्रिणी झाल्याचं आतापर्यंत आपण पाहिलं आहे. अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट त्यापैकीच एक. येत्या काळात या दोघांचाही एकत्र असा कोणताही चित्रपट येत नाहीये. तरीही त्यांच्या नावाची चर्चा सुरुये. असं का? 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या Bloody Daddy च्या निमित्तानं शाहीद सध्या अनेक मुलाखती देताना दिसतोय. अशाच एका मुलाखतीदरम्यान त्याला आलियाविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर उत्तर देताना ती वयाच्या 29 व्या वर्षीच आई झालीये यावर विश्वासच बसत नसल्याचं तो म्हणाला. 

आलियाविषयी काय म्हणाला शाहिद? 

'आलिया प्रचंड जिज्ञासू आहे, त्यामुळं ती प्रश्नच विचारत राहील. हल्लीच आम्ही भेटलो होतो. तिच्यासोबत असणंही खुपच छान भासवतं. ती आता एक आई आहे. पण, माझा विश्वासच बसत नाहीये की ती आई आहे. मी तिच्यासोबत काम केलं तेव्हा ती 21 वर्षांची होते. जेव्हा तुम्ही एखद्या व्यक्तीसोबत बराच वेळ व्यतीत करता आणि नंतर फार काळ तुमची भेटच होत नाही, तेव्हाही तुम्ही त्या व्यक्तीमध्ये फारसे फरक पाहतच नाही. त्यांच्यातील बदल तुम्हाला जाणवतच नाहीत', असं शाहिद आलियाचा उल्लेख निघताच म्हणाला. 

अर्थाचा अनर्थ झालाच... 

इथं शाहिदनं वेगळ्या अर्थानं आलिया वयाच्या 29 व्या वर्षी आई झाल्याचं म्हणत आपली वैयक्तिक प्रतिक्रिया दिली. ज्यानंतर त्याच्यावर अनेकांनी सडकून टीका केली. यावेळी अनेकांनीच शाहिदला त्याच्या आणि त्याच्या पत्नीमधील वयाचा फरक लक्षात आणून दिला. 

हेसुद्धा वाचा : अगदी सोपं आणि कुठंही करता येईल असं हे 'ताडासन'; फायदे वाचून लगेचच करून पाहाल 

'तुझं आणि मीराचं लग्न झालं तेव्हा तू 34 वर्षांचा आणि ती 20 वर्षांची होती', असं म्हणत काहींनी मीरा 21 व्या वर्षीच आई झाल्याची बाब त्याच्या लक्षात आणून दिली. 'आपल्या बोलण्यानं वाद होऊ शकतो याची कल्पना नसल्यास काही लोकांनी आता नेमकं काय आणि कसं बोलायचं हे शिकायला पाहिजे', अशी उपरोधिक टिकाही काही नेटकऱ्यांनी दिली. आता नेटकऱ्यांनी इतके कान टोचल्यानंतर शाहिदला नक्कीच आपण नेमके कुठं चुकलो याचा अंदाज आला असेल. नाही का?