प्रियांकाच्या Ex Boyfriend नं तिच्या पतीला जे सांगितलं ते ऐकून म्हणाल...

कोण होता, प्रियांकाचा Ex Boyfriend?

Updated: Nov 9, 2021, 05:56 PM IST
प्रियांकाच्या  Ex Boyfriend नं तिच्या पतीला जे सांगितलं ते ऐकून म्हणाल... title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या खासगी आयुष्यामुळं आजवर कायम चर्चेत होती आणि आताही आहे. प्रियांकानं अमेरिकन गायक निक जोनास याच्याशी लग्नगाठ बांधली. सध्या ती परदेशातच अधिकाधिक वेळ व्यतीत करताना दिसते. अशी ही अभिनेत्री लग्नाआधी बॉलिवूड अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. 

प्रियांकासोबत रिलेशनशिपमध्ये असणारा हा अभिनेता होता, साहिद कपूर. शाहिद आणि प्रियांकाच्या नात्यात दुरावा आल्यानंतर या दोघांनीही स्वत:सा सावरत भूतकाळ विसरण्यावर लक्ष दिलं होतं. ज्यानंतर हे दोघंही एकमेकांच्या आनंदात मोठ्या मनानं सहभागी झाले होते. 2018 मध्ये शाहिदनं एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. 

करण जोहरच्या चॅट शोवर शाहिद त्याचा भाऊ इशान खट्टर याच्यासोबत आला होता. तिथं त्याला वैवाहिक आयुष्याबाबत निकला काही सल्ले देण्यास सांगितलं होतं. त्यावेळी शाहिद म्हणाला होता, 'मी निकला हेच सांगू इच्छितो की, त्यानं कधीच या नात्यात दुरावा पत्करत कोलमडू नये. प्रियांका खऱ्या अर्थानं एक देसी गर्ल आहे. तू एका देसी गर्लसोबतच आहेस.'

प्रियांकाशी असणारं मैत्रीचं नातं पाहता शाहिदनं दुसऱ्या एका चॅट शोवरही असाच सल्ला दिला होता. प्रियांका आणि निक यांच्या संस्कृती वेगवेगळ्या असल्यामुळे त्यांनी एकमेकांना अधिकाधिक समजून घ्यावं, असा मोलाचा सल्ला त्यानं दिला होता. 

शाहिद आणि प्रियांकाच्या नात्यात नेमका दुरावा का आला हे कोणालाही ठाऊक नव्हतं. पण, त्यांच्यातील मैत्री मात्र अधिकाधिक घट्टच होताना दिसत आहे.