अफेअरच्या चर्चांमध्येच रात्री उशिरा सुहाना परत 'त्या'च्यासोबतच दिसली आणि....

'आँखो का तारा' म्हटलं तरी हरकत नाही. 

Updated: Aug 3, 2022, 10:39 AM IST
अफेअरच्या चर्चांमध्येच रात्री उशिरा सुहाना परत 'त्या'च्यासोबतच दिसली आणि....  title=
Bollywood Actor Suhana Khan spotted with amitabh bachchan grandson Agastya NandaVideo

Suhana Khan Date : अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान तिच्या अभिनयातील पदार्पणामुळं चांगलीच चर्चेत आली आहे. मागील काही वर्षांपासून फोटोशूट असो किंवा मग एखाद्या कार्यक्रमाला उपस्थिती असो सुहानानं कायमच सर्वांच्या नजरा वळवल्या. त्यातच आता ती झोया अख्तर दिग्दर्शित 'आर्चिस' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीलाही येणार आहे. 

थोडक्यात काय, तर सुहाना चर्चेत येण्यासाठी पुरेशी कारणं सध्या पाहायला मिळत आहेत. त्यातच आता आणखी एका मुद्द्याची भरही पडली आहे. तो मुद्दा म्हणजे तिचं अफेअर. 

करिअरची सुरुवातही झाली नाही, तोच अफेअर? तुम्हालाही धक्का बसला ना? याबाबत कोणतंही अधिकृत वृत्त नाही. पण, गेल्या काही काळापासून सुहाना एका तरुणासोबत अनेकदा दिसत आहे. या तरुणासोबतचं तिचं नातं मैत्रीपेक्षाही जास्तच खास असल्याचं म्हटलं गेलं. बरं हा तरुण कलाजगतासाठी नवा नाही पण, चाहत्यांसाठी मात्र त्याचा चेहरा नवा आहे. 

हा तरुण आहे, बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातू, श्वेता नंदाचा मुलगा अगस्त्य नंदा. (Suhana Khan Date With Agastya Nanda) हल्लीच सुहाना आणि अगस्त्यला मुंबईतील एका रेस्तराँमधून रात्री उशिरानं बाहेर पडताना पाहायला मिळालं. यावेळी सुहानानं क्रॉप टॉप, डेनिम आणि शूज अशा लूकला पसंती दिली होती. (Bollywood Actor Suhana Khan spotted with amitabh bachchan grandson Agastya NandaVideo )

सुहाना आणि अगस्त्य यांच्यासोबत त्यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता नंदासुद्धा उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. अगस्त्य आणि सुहाना माध्यमांसमोर येतात तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी त्यांच्या नात्याची खास बाजू लपवताना दिसतात. पण, पाहणाऱ्यांच्या नजरा कधी काय हेरतील याचा नेम नाही.