Guess Who: चिमुकल्या हातांवर राखी बांधून घेणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलत का?

पाकिस्तानला घाम फोडला होता 'या' अभिनेत्याने, कोण आहे हा अभिनेता? 

Updated: Aug 13, 2022, 08:21 PM IST
Guess Who: चिमुकल्या हातांवर राखी बांधून घेणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलत का?  title=

मुंबई : बॉलीवूड स्टार्सचे बालपणीचे फोटो अनेकदा सोशल मीडिया व्हायरल होत असतात. मात्र सध्याचा त्यांचा लुक आणि लहाणपणीचा त्यांचा निरागस चेहरा पाहून अभिनेता अथवा अभिनेत्री ओळखण अवघड जातं. असाचं एक फोटो समोर आला आहे. या फोटोतला अभिनेता ओळखण अनेकांना कठिण जात आहे. 

फोटोत काय? 
एका बॉलीवूड सेलिब्रिटीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत सोफ्यावर बसलेल्या मुलाला त्याची बहीण राखी बांधताना दिसतेय. हा चिमुकला आता बॉलिवूडचा मोठा सुपरस्टार अभिनेता आहे. या फोटोतील हा सुपरस्टार मुलगा कोण आहे हे तुम्हाला ओळखता येतेय काय?  

सिनेमातला हा सीन...
आम्ही तुम्हाला हा छोटासा क्लु देतोय. त्यावरून तुम्हाला हा अभिनेता ओळखता येतोय का पाहा. हा तो अभिनेता आहे ज्याने चित्रपटात पाकिस्तानला देखील घाम फोडला होता. अभिनेता गुपचूप सीमा ओलांडून सकीनासाठी पाकिस्तानात पोहोचला होता. आता तुम्हाला कदाचित समजला असेल हा अभिनेता कोण आहे?

हा अभिनेता दुसरा कोणी नसून सनी देओल आहे. त्याला बॉलिवूडचे अॅक्शन स्टार म्हटले तरी वावगे ठरणार नाही. घायाळ, दामिनी, घटक या चित्रपटांनी सनी देओलची अॅक्शन स्टार अशी प्रतिमा बनवली. बॉलिवूडमध्ये त्याने अनेक हीट चित्रपट दिले आहेत. सध्या तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.