close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

...म्हणून सनी देओल-शाहरुखमध्ये १६ वर्षांचा अबोला

शाहरुख खान, सनी देओल आणि यश चोप्रा या तिकडीने पुन्हा एकत्र कधी काम केलं नाही

Updated: Jun 18, 2019, 01:32 PM IST
...म्हणून सनी देओल-शाहरुखमध्ये १६ वर्षांचा अबोला

मुबंई : बॉलिवूड चाहत्यांना आजही शाहरुख खान आणि सनी देओल यांचा 'डर' चित्रपट लक्षात आहे. यश चोप्रा दिग्दर्शित 'डर' एक सायकोथ्रिलर चित्रपट होता. या चित्रपटाला चाहत्यांची चांगली पसंतीही मिळाली. परंतु 'डर'नंतर शाहरुख खान, सनी देओल आणि यश चोप्रा या तिगडीने पुन्हा एकत्र कधी काम केलं नाही. 'डर' चित्रपटानंतर सनी देओल यांनी कधीही यश चोप्रा यांच्यासोबत काम केलं नाही. एवढंच नाही तर सनी देओल शाहरुख खानसोबतही तब्बल १६ वर्ष बोलले नव्हते.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत यासंदर्भात सनी देओल यांनी त्या गोष्टीचा खुलासा केला. सनी देओल यांना मुलाखतीत 'डर'च्या सेटवर शाहरुख आणि यश चोप्रा तुम्हाला घाबरत होते असा सवाल करण्यात आला, त्याला उत्तर देत सनी देओल यांनी 'ते चुकीचे होते म्हणून कदाचित ते घाबरत असतील' असं उत्तर दिलं.

यावेळी 'डर' चित्रपटादरम्यान घडलेल्या एका प्रसंगाची सनी देओल यांनी आठवण करुन दिली. 'चित्रपटात शाहरुख मला चाकू मारतो असा सीन होता. या सीनबाबत यश चोप्रा यांच्यासोबत माझी मोठी चर्चाही झाली होती. चित्रपटात मी कमांडोच्या भूमिकेत होतो आणि शाहरुखला मला चाकू मारायचा होता. मी जर कमांडो आहे, फीट आहे तर मला कोण कसं काय चाकू मारु शकतं...याच गोष्टींचा मला राग आला होता.' असं सनी यांनी सांगितलं.

'यशजी मोठे होते, मी त्यांना काही बोलू शकत नव्हतं. मला इतका राग आला होता की, मी रागात माझे हाथ जीन्सच्या खिशात टाकले आणि मला समजलंच नाही की रागात मी माझ्या जीन्सचे खिसे फाडले होते.' 

१६ वर्षांपर्यंत शाहरुखसोबत बोलले नसल्याबाबतच्या प्रश्नावर सनीने 'असं नाही की मी बोललो नाही. मी जास्त सोशलाइज नाही करत, कोणाशीही अधिक बोलत नाही. आम्ही दोघंही कधी एकत्र भेटलो नाही तर बोलण्याचा प्रश्नच नाही. मी कोणत्याही पार्टी, कार्यक्रमात जात नाही, त्यामुळे न बोलण्याचा प्रश्नच उद्धवत नसल्याचं' सनी देओल यांनी म्हटलंय.

सनी देओल गुरुदासपूरचे भाजपाचे खासदार आहेत. लोकसभा निवडणूकीवेळी त्यांनी अनेक प्रचार सभा, प्रसार केला होता.