close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मी ऐश्वर्याचा एक्झिट पोल, तर सलमान ओपिनियन पोल- विवेक ओबेरॉय

संदर्भ आहे तो म्हणजे... 

Updated: May 20, 2019, 04:08 PM IST
मी ऐश्वर्याचा एक्झिट पोल, तर सलमान ओपिनियन पोल- विवेक ओबेरॉय

मुंबई : कलाविश्वात सेलिब्रिटींच्या नात्याविषयी चाहत्यांना बरीच उत्सुकता लागलेली असते. बॉलिवूडमध्ये आजवर बऱ्याच कलाकारांनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी काही गोष्टी मोठ्या खुलेपणाने माध्यमांपासून चाहत्यांपर्यंत प्रत्येकापुढे ठेवल्या. पण, काही सेलिब्रिटींनी मात्र खासगी आयुष्याविषयी फार काही उघडपणे सांगितलेलं नाही. सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमुळे चर्चेत असणारा अभिनेता विवेक ओबेरॉय हा त्याच्या एका ट्विटमुळे चर्चेत आला आहे. इथे संदर्भ आहे तो म्हणजे त्याच्या खासगी आयुष्याचा. 

सध्याच्या घडीला संपूर्ण देशात एक्झिट पोलच्याच चर्चा सुरु आहेत. देशात कोणाची सत्ता स्थापन होणार, याविषयीच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच विवेकने ओपिनियन पोल, एक्झिट पोल आणि निवडणुकांच्या निकालांमध्ये असणारा फरक स्पष्ट केला आहे. पण, त्याला थोडं वेगळं वळण देत. 'ओपिनियन पोल', 'एक्झिट पोल' आणि निकाल यांणध्ये बरीच तफावत असते, अशा आशयाचं एक विनोदी मीम त्याने ट्विटरवर शेअर केलं आहे. ज्यावर चक्क अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, सलमान खान आणि अभिषेक बच्चन झळकत आहेत. 

विवेकने शेअर केलेल्या मीममध्ये सलमान आणि ऐश्वर्याचा फोटो असणाऱ्या भागावर ओपिनियन पोल असं लिहिण्यात आलं आहे. खुद्द विवेक आणि ऐश्वर्याचा फोटो आहे, त्यावर एक्झिट पोल असं लिहिण्यात आलं आहे. तर, अभिषेक बच्चनसोबतच्या तिच्या फोटोवर 'रिझल्ट्स' अर्थात निकाल असं लिहिण्यात आलं आहे. हे मीम शेअर करताना त्याने कॅप्शन देत लिहिलं, 'ही कलात्मकता आहे, यात राजकारण नाही... हेच आयुष्य....' विवेकने शेअर केलेलं हे मीम पाहता आता ते उर्वरित सेलिब्रिटी मंडळी तितक्याच विनोदी अंगाने घेणार की त्यावर गांभीर्याने चर्चा करणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्य म्हणजे याला राजकीय वळणही देण्यात येत आहे. त्यामुळे आता चर्चा तर होणारच.  

विवेकने शेअर केलेल्या या मीमला या कलाकारांच्या खासगी आयुष्याशी जोडल्यास काही गोष्टी लक्षात येतात. बऱ्याच वर्षांपूर्वी सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यासोबत ऐश्वर्या रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात होतं. पण, काही कारणास्तव यातील एकही नातं पुढपर्यंत टीकलं नाही. करिअर आणि खासगी आयुष्यातही बरंच पुढे आलेल्या ऐश्वर्याने बिग बी अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याच्याशी लग्नगाठ बांधली.