लोकप्रिय सेलिब्रिटी जोडीचा घटस्फोट; मुलाच्या संगोपनाची जबाबदारी...

त्यांचं वैवाहिक नातं आता अधिकृतपणे संपुष्टात आलं आहे.   

Updated: Aug 14, 2020, 04:24 PM IST
लोकप्रिय सेलिब्रिटी जोडीचा घटस्फोट; मुलाच्या संगोपनाची जबाबदारी...  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : एकिकडे कलाविश्वात सेलिब्रिटी वर्तुळात लग्नसराईचे वारे वाहत असतानाच दुसरीकडे मात्र, एका लोकप्रिय सेलिब्रिटी जोडप्याच्या नात्यात कायमचा दुरावा आला आहे. कारण, या जोडीला अधिकृतपणे घटस्फोट मिळाला आहे. विविध चित्रपटांमधून झळकलेले रणवीर शौरी आणि कोंकणा सेन शर्मा अशी या कलाकारांची नावं असून, त्यांचं वैवाहिक नातं आता अधिकृतपणे संपुष्टात आलं आहे. 

'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार १३ ऑगस्टलाच रणवीर आणि कोंकणा यांचा घटस्फोट मंजूर झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, ते वेगवेगळे आले आणि घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करुन गेले. अतिशय शांततापूर्ण मार्गानं हे सारंकाही पार पडलं. मुख्य म्हणजे या दोघांनीही नात्यात पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न केला नाही असं नव्हे. तर, अनेकदा समुपदेशन घेऊनही त्यांच्या नात्याच्या बाबतीत मात्र याचा फारसा फरक पडताना दिसला नाही. 

 

लग्नाच्या ५ वर्षांनंतर अभिनेत्री कोंकणा सेन आणि रणवीरचा घटस्फोटाचा निर्णय

कोंकणा आणि रणवीर या दोघांनीही २००७मध्ये डेटिंग सुरू केलं. दोघांनी एका खाजगी समारंभात २०१०मध्ये लग्न केलं होतं. 'ट्रॅफिक सिग्नल', 'मिक्स्ड डबल्स', 'आजा नचले' आणि 'गौर हरि दास्तान' सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. चित्रपटांमध्ये भूमिका साकारणाही ही जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आली खरी. पण, नात्यांचे हे बंध फार काळ टीकले नाहीत. दरम्यान, कोंकणा आणि रणवीर या दोघांनाही एक आठ वर्षांचा मुलगा आहे, ज्याच्या संगोपनाची जबाबदारी अर्थात मुलाचा ताबा हा या दोघांकडेही असणार आहे.