असंख्य युट्यूबर्सना टक्कर देण्यासाठी आलिया सज्ज

नव्या युट्यूब चॅनलसह एका नव्या कारकिर्दीची सुरुवात

Updated: Jun 27, 2019, 10:32 AM IST
असंख्य युट्यूबर्सना टक्कर देण्यासाठी आलिया सज्ज  title=

मुंबई : आगामी चित्रपटांच्या तयारीत अतिशय व्यग्र असणाऱ्या अभिनेत्री आलिया भट्ट हिने एक नवी जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. अभिनेत्री म्हणून नावारुपास येणारी आलिया आता एक युट्यूबर म्हणूनही सर्वांची मनं जिंकण्यास सज्ज झाली आहे. त्यामुळे तिचा हा अंदाज सध्या बॉलिवूड वर्तुळाच प्रशंसेस पात्र ठरत आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध मार्गांचा अवलंब करत आपण चाहत्यांच्या भेटीला आलो. त्यातच भर म्हणून आता युट्युबच्या विश्वात पदार्पण करत असल्याचं आलियाने सांगितलं आहे. ही आनंदाची बातमी देत तिने एक व्हिडिओही पोस्ट केला. ज्यामध्ये तिच्या युट्युब चॅनलवर नेमके कोणत्या प्रकारचे व्हिडिओ चाहत्यांना पाहता येतील याचाही उलगडा करण्यात आला आहे. 

'आलिया भट्ट' असंच तिच्या युट्युब चॅनलचं नाव आहे, ज्यावर चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान नेमकी काय धमाल चालते इथपासून आलियाचं दैनंदिन आयुष्य, मेकअप, मित्रमंडळी आणि इतरही बऱ्याच गोष्टींवर या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे युट्युबवर पदार्पण केल्याची माहिती देताच लगेचच चाहत्यांनी तिचा हा चॅनल सब्सक्राईब केला. सध्याच्या घडीला सब्रक्रायबर्सचा हा आकडा दोन लाखांच्याही पलीकडे पोहोचला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने तिची दणक्यात सुरुवात झाली आहे, असंच म्हणावं लागेल. 

एका नव्या विश्वात इतर युट्युबर्सना टक्कर देण्यासाठी आलेली आलिया तिच्या आगामी चित्रपटांवरही पूर्ण लक्ष केंद्रीत करत आहे. सध्याच्या घडीला ती बनारसमध्ये अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. यामध्ये ती रणबीर कपूरसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे.