अनुष्का- विराटमध्ये दुरावा; हा हसरा फोटो आता इतिहासजमा

हा दुरावा नेमका का आणि कसा ...

Updated: Oct 17, 2021, 02:48 PM IST
अनुष्का- विराटमध्ये दुरावा; हा हसरा फोटो आता इतिहासजमा
छाया सौजन्य- सौशल मीडिया

मुंबई : क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या नात्याने प्रत्येक वेळी चाहत्यांना आणि क्रीडाप्रेमींना कपल गोल्स दिले आहेत. विविध प्रसंगी या जोडीनं एकमेकांना साथ दिल्याचं पाहायला मिळालं आहे. पण, आता म्हणे या जोडीच्या नात्यात दुरावा आला आहे. हा दुरावा नेमका का आणि कसा आला हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? 

अनुष्कानंच सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून याची झलक सर्वांपुढे आणली. अनुष्का आणि विराट सध्या युएईमध्ये आहेत. क्रिकेट टी 20 विश्वचषकासाठी ही जोडी सध्या तिथे पोहोचली आहे. पाकिस्तानसोबतच्या टी20 सामन्यापूर्वीच्या वास्तव्यासाठी भारतीय क्रिकेट संघ तिथे पोहोचला आहे. जिथे विराट दुसऱ्याच बाल्कनीमध्ये दिसत असून, अनुष्कानं त्याचे फोटो क्लिक केले आहेत. विराट आणि अनुष्कामध्ये हा मजेशीर दुरावा असला तरीही या फोटोंतूनही त्यांच्या नात्याची सुरेख बाजू सर्वांसमोर पाहायला मिळत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

तिच्या या पोस्टला अनेक लाईक्स मिळाले आहेत. कित्येकांनी त्यावर कमेंटही केली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा या पोस्टवर व्यक्त झाले असून, काही वेळासाठी या फोटोची कमाल चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं.