close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बालपणीचे फोटो शेअर करणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

आजच्या घडीला ती एक यशस्वी अभिनेत्री असण्यासोबतच निर्मातीही आहे   

Updated: Sep 14, 2019, 01:08 PM IST
बालपणीचे फोटो शेअर करणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : लहानपण देगा देवा.... असं म्हणत प्रत्येकजण एकदा तरी त्यांच्या बालपणीच्या दिवसांमध्ये डोकावत असतं. यामध्ये बी टाऊन सेलिब्रिटी मागे नाहीत. सध्या सेलिब्रिटींच्या बालपणाचा मुद्दा समोर येण्याचं कारण म्हणजे अभिनेत्रीने शेअर केलेले तिच्या बालपणीचे फोटो. 

मी लहानपणी अशी दिसायचे असं म्हणत अनेकदा मोठ्या कुतूहलाने आणि उत्साहाने सर्वांनीच त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर केले असतानाच ही अभिनेत्रीसुद्धा यात मागे नाही. अभिनयासोबतच निर्मिती आणि व्यवसाय क्षेत्रात नाव कमवणारी ती भारतीय क्रिकेटरच्याही मनावर अधिराज्य गाजवते. 

ती अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा. 'लिटिल मी...', असं कॅप्शन लिहित तिने बालपणीचे दोन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलं. तिचे हे फोटो पाहून विराटही स्वत: यावर कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. त्याने हृदयाच्या आकाराचे इमोजी पोस्ट करत तिच्या फोटोंवर कमेंट केली. विराट आणि अनुष्काची ही केमिस्ट्री चाहत्यांचीही मनं जिंकत आहे. 

 
 
 
 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

 
 
 
 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

 
 
 
 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

सोशल मीडियावर सक्रिय असणारी ही जोडी कायमच सर्वांचं लक्ष वेधत असते. त्यांची अशीच एक बाजू नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात पाहायला मिळाली. फिरोजशहा कोटला स्टेडियमवर विराटचं नाव एका पविलियला देण्यात आलं, त्यावेळी अनुष्काच्या चेहऱ्यावर पाहणारा आनंद पाहण्याजोगा होता.