मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासु गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. पण सोशल मीडियावरुन बिपाशा नेहमी अॅक्टिव्ह असते. तिचे अनेक फोटोही ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
आजही बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींमध्ये बिपाशाचं नाव घेतलं जातं. नुकताच बिपाशाने तिच्या कॉलेजच्या दिवसांतील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये बिपाशा टॅन लूकमध्ये दिसत असून पुन्हा टॅन लूक हवा असल्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.
जवळपास २० वर्षांपूर्वीचा मॅग्जिन कव्हर पेजसाठीचा फोटोही तिने शेयर केला आहे. फोटोमध्ये ती स्विमसूटमध्ये दिसत असून तिच्या पहिल्या बिकिनी शूटचा फोटो असल्याचं तिने म्हटलंय.
चाहत्यांकडून बिपाशाच्या जुन्या लूकला चांगली पसंती मिळत आहे. बिपाशा २०१५ मध्ये 'अलोन' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्या चित्रपटात करण सिंह ग्रोवरही होता. या चित्रपटानंतर दोघं विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर बिपाशा रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र, आता बिपाशा केव्हा पुनरागमन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.