VIDEO : 'जुम्मा चुम्मा'वर रणवीर, बिग बी थिरकले आणि...

 मित्रमंडळी आणि कलाविश्वातील प्रसिद्ध व्यक्तींनी दीप-वीरला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत पार पडलेल्या स्वागत सोहळ्याला उपस्थिती लावली. 

Updated: Dec 2, 2018, 11:31 AM IST
VIDEO : 'जुम्मा चुम्मा'वर रणवीर, बिग बी थिरकले आणि...

मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या विवाहसोहळ्याला कमी पाहुण्यांची उपस्थिती असली तरीही त्यांच्या लग्नाच्याच निमित्ताने आयोजित केलेल्या स्वागत सोह्ळ्यांमध्ये मात्र अगदी वेगळं चित्र पाहायला मिळालं. मित्रमंडळी आणि कलाविश्वातील प्रसिद्ध व्यक्तींनी दीप-वीरला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत पार पडलेल्या स्वागत सोहळ्याला उपस्थिती लावली. 

बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून किंग खानपर्यंत आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकरपासून महेंद्रसिंह धोनी, हार्दीक पांड्यापर्यंत सर्वांनीच या कार्यक्रमात येत त्याची शोभा वाढवल्याचं पाहायला मिळालं. 

सेलिब्रिटींच्या या गर्दीत बऱ्याच पिढ्याही एकत्र आल्याचं दिसलं आणि मग काय... एकच कल्ला झाला. किंग खानने या पार्टीमध्ये मलायका अरोरा हिच्यासह दिल से चित्रपटातील त्याच्या 'छैय्या छैय्या' या लोकप्रिय गाण्यावर ठेका धरला. तर रणवीरनेही त्याच्या अंदाजात या गाण्यावर नृत्य सादर केलं. 

 
 
 
 

A post shared by DeepVeer Wale (@deepveer.news) on

बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबतची रणवीरने 'जुम्मा चुम्मा' या गाण्यावर ठेका धरला. यावेळी उपस्थितांचा उत्साहही पाहण्याजोगा होता. रॅप या प्रकाराशी असणारं रणवीरचं नातं सर्वांनाच ठाऊक आहे. याचीच झलक त्याच्या रिसेप्शनमध्येही पाहायला मिळाली. 

दीपिकाविषयी बोलावं तितकं कमीच असाच एकंदर रणवीरचा अंदाज स्वागतसोहळ्यातही पाहायला मिळाला.  ती म्हणेल त्या गोष्टीला आपला होकार आहे.... असं म्हणत तिने गाणं बदलण्यास सांगितलं की गाणं बदलणारच असंही तो मोठ्या विनोदी अंदाजात बोलल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणवीर आणि दीपिकाच्या मुंबईतील स्वागत सोहळ्याकडे साऱ्यांचच लक्ष लागून राहिलं होतं आणि अर्थातच या कार्यक्रमात संपूर्ण कलाविश्व एकवटल्याचं दिसलं.