लग्नापूर्वी सेक्स आणि प्रेग्नंन्सीच्या मुद्यावर ही अभिनेत्री थेटचं बोलली

अभिनेत्रीने लग्नापूर्वी सेक्स आणि प्रेग्नेसीच्या मुद्यावर आपले मत मांडले आहे.

Updated: Jul 2, 2022, 06:29 PM IST
 लग्नापूर्वी सेक्स आणि प्रेग्नंन्सीच्या मुद्यावर ही अभिनेत्री थेटचं बोलली

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा फार कमी अभिनेत्री आहेत, ज्या सडेतोडपणे अनेक विषयावर आपल्या प्रतिक्रिया देत असतात. आता एका अभिनेत्रीने लग्नापूर्वी सेक्स आणि प्रेग्नेसीच्या मुद्यावर आपले मत मांडले आहे. तिच्या या मताची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगलीय.  

अभिनेत्री दिया मिर्झा प्रत्येक मुद्द्यावर सडेतोडपणे आपले मत उघडपणे मांडत असते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिया मिर्झाने एक मोठं वक्तव्य केलं आहे. दिया मिर्झा म्हणते की, लग्नापूर्वी सेक्स आणि गर्भधारणा ही पूर्णपणे वैयक्तिक निवड असल्याचे मत तिने नोंदवलं आहे. 

ई-टाइम्सशी संवाद साधताना दिया म्हणाली की, आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत जे लग्नापूर्वी सेक्स आणि गर्भधारणेचा विचार वाईट मानतात, परंतु असे बरेच लोक आहेत जे याला वैयक्तिक पसंतीही मानतात. जर कोणी असे पाऊल उचलले तर तो त्याचा हक्क आहे, असे तिचे मत आहे.

दिया मिर्झा पुढे म्हणते की, आपण जसा विचार करतो त्याप्रमाणे आपले विचार नाहीयेत. आपण स्वत:ला जितके ओपन मांईडेड समजतो, तितके आपण नाही आहो, असेही ती म्हणते.  

दिया मिर्झा लवकरच अनुभव सिन्हा यांच्या 'भोद' चित्रपटात दिसणार आहे. याआधी दिया 'थप्पड', 'दस' आणि 'कॅश' या चित्रपटांमध्ये दिसली आहे. याशिवाय दिया मिर्झाकडे तापसी पन्नूचा 'धक धक' चित्रपटही आहे. यामध्ये फातिमा सना शेख, संजना संघी आणि रत्ना पाठक शाह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.