मुंबई : जॅकलिन फर्नांडिस देखील बॉलिवूडमधील इतर कलाकारांप्रमाणेच कोरोना साथीच्या आजारात लोकांना मदत करण्यासाठी पुढे आली आहे. नुकतेच तिने कोविड सेंटर सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. जॅकलिन फर्नांडिस म्हणाली की, 'आम्ही 100 बेड्स आणि 500 ऑक्सीजन कंसंट्रेटरसह एक रुग्णालय सुरु करणार आहोत. या व्यतिरिक्त आम्ही 2 रुग्णवाहिका देखील खरेदी केल्या आहेत.
जॅकलिन फर्नांडिस सांगितले की, आम्ही लोकांना मोफत रुग्णवाहिका सुविधा देऊ कारण दुर्दैवाने रुग्णवाहिका सेवा खूपच महाग आहे. त्यामुळे वेळेवर रुग्णालयात येऊ न शकल्याने ते आपला जीव गमावतात. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, या कारणास्तव, आम्ही 2 रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत, जे पूर्णपणे अत्याधुनिक असतील.'
नुकतीच जॅकलिन फर्नांडिस हिने कोरोना काळात अन्न वाटप देखील केले. स्वयंसेवी संस्थेसोबत ती हे काम करत आहे. याआधी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी 100 ऑक्सिजन कंसंट्रेटर दिली आहेत. अमिताभ बच्चन यांनी देखील 50 ऑक्सिजन कंसंट्रेटर आणि 20 व्हेंटिलेटर दिले आहेत. संपूर्ण देश एकत्र लढत आहे. आणि यावर त्वरीत मात करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने बऱ्याच चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. तिच्या भूमिकांना खूपच पसंती मिळाली आहे. जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतात. ती बर्याचदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते जे खूप वेगाने व्हायरल देखील होतात. सलमान खान, अक्षय कुमार आणि सुशांतसिंग राजपूत अशा बर्याच कलाकारांसोबत तिने काम केले आहे. ती सलमान खानसोबत किक 2 या चित्रपटात दिसणार आहे.