संजूबाबाची 'अधूरी प्रेम कहानी'; प्रेमासाठी पत्नीपासून झाला दूर, पण...

संजूबाबाच्या करियरच्या प्रवासात त्याची प्रेम प्रकरणं देखील तुफान गाजली

Updated: May 15, 2021, 02:06 PM IST
संजूबाबाची 'अधूरी प्रेम कहानी'; प्रेमासाठी पत्नीपासून झाला दूर, पण...

मुंबई : बॉलिवूडचा संजूबाबा अर्थातचं अभिनेता संजय कपूर. संजयने बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावलं. करियरच्या प्रवासात त्याची प्रेम प्रकरणं देखील तुफान गाजली, त्यातील एक म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत असलेलं त्याचं नातं.  माधुरी दीक्षितचं नाव देखील अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं. पण सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे संजय दत्तसोबत असलेल्या नात्याची. संजय आणि माधुरी 'साजन' चित्रपटाच्या माध्यामातून जवळ आले. पण मुंबईत झालेल्या हल्ल्यात जेव्हा संजयचं नाव पुढे आलं, तेव्हा हे नातं तुटलं. 

संजय दत्तच्या  आयुष्यावर आधारित आणि यासीर अहमद लिखीत 'संजय दत्त: द क्रेजी अनटोल्ड लव स्टोरी ऑफ बॉलीवुड बॅड बॉय' पुस्तकात संजयच्या अनेक रहस्यांवर  प्रकाश टाकण्यात आला आहे. जेव्हा संजयच्या अफेअरबद्दल त्याची पत्नी ऋचाला कळाली तेव्हा न्यूयॉर्कमध्ये होती. न्यूयॉर्कमध्ये ती कर्करोगावर उपचार घेत होती.

संजय आणि माधुरीच्या नात्याबद्दल ऋचालवा कळताचं ती मुंबईत तिचं लग्न वाचवण्यासाठी आली. पण तेव्हा संजूबाबाच्या मनात माधुरीने घर केलं होतं. त्यामुळे ऋचा पुन्हा परदेशी निघून गेली. त्यानंतर तिचं कर्करोगामुळे निधन झालं. पण माधुरी आणि संजयची लव्हस्टोरी काही पूर्ण झाली नाही. मुंबईत झालेल्या हल्ल्यात जेव्हा संजयचं नाव पुढे आलं, तेव्हा हे नातं तुटलं. 

त्यानंतर 1999 साली माधुरी दीक्षितने अमेरिका स्थित डॉक्टर श्रीराम माधव नेने यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर माधुरी अमेरिकेत गेली. फार वर्षांनंतर ती पुन्हा मुंबईत आली.