खास माणसं, खास ठिकाण आणि तितकाच खास लूक; जान्हवीच्या अदांनी सर्व घायाळ

ही अभिनेत्री आता म्हणे काही निवांत क्षणांचा आस्वाद घेत आहे. 

Updated: Jan 20, 2022, 03:57 PM IST
खास माणसं, खास ठिकाण आणि तितकाच खास लूक; जान्हवीच्या अदांनी सर्व घायाळ  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूडमध्ये पदार्पणानंतर लगेचच लोकप्रिय झालेल्या अभिनेत्रींमध्ये जान्हवी कपूर, अर्थात अभिनेत्री श्रीदेवी आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांच्या लेकीचं नावही घेतलं जातं. फार कमी काळात जान्हवी प्रचंड लोकप्रिय झाली. दिवसागणिक नव्या प्रोजेक्टमध्ये गुंतलेली दिसू लागली. अशी ही अभिनेत्री आता म्हणे काही निवांत क्षणांचा आस्वाद घेत आहे. 

या क्षणी तिला खास मंडळींची साथही मिळत आहे. खुद्द जान्हवीनंच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले, ज्यामध्ये ती काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये स्विमिग पूलपाशी बसलेली दिसत आहे. 

आता जान्हवीनं हे सारं कोणासाठी केलं, असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर त्याचं उत्तर आहे, तिनं हे स्वत:च्या आनंदासाठी केलं.

'यूडिमोनिया', म्हणजेच एक चांगलं आयुष्य अशा आशयाचं कॅप्शन तिनं या पोस्टला दिलं आहे. 

फोटोमध्ये जान्हवी तिच्या खास मित्रमंडळींसमवेत या क्षणांचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे. 

जान्हवीचा हा लूक सर्वांनाच घायाळ करुन जात आहे. फक्त मोनोकिनी लूकच नव्हे, तर ती इथं काही कॅज्युअल टी शर्टमध्येही दिसत आहे.

एखाद्या सहलीला जाताना ज्याप्रमाणे आपण सोयीनुसार कपडे घेऊन जातो, आणि तितक्याच सोयीनुसार ते बदलतोही; जान्हवीचे हे फोटो पाहता तिनंही असंच काहीसं केल्याचं कळत आहे. 

कामात व्यग्र असतानाही ही अभिनेत्री कायमच स्वत:साठी वेळ काढताना दिसते. 

एकिकडे काम खुणावत असलं तरीही जेव्हा आरामाची गरज असते तेव्हा मात्र ती स्वत:साठी वेळ काढते आणि या विश्रांतीनंतर नव्या जोमाने कामाला लागते.