बहुचर्चित सेलिब्रिटी जोडीने पुन्हा साकारलं 'श्री ४२०'मधील लोकप्रिय दृश्य

पाहा त्याचाच एक व्हिडिओ 

Updated: Oct 14, 2019, 07:14 PM IST
बहुचर्चित सेलिब्रिटी जोडीने पुन्हा साकारलं 'श्री ४२०'मधील लोकप्रिय दृश्य
बहुचर्चित सेलिब्रिटी जोडीनं पुन्हा साकारलं 'श्री ४२०'मधील लोकप्रिय दृश्य

मुंबई : राज कपूर आणि नर्गिस यांची जोडी कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिली. ही जोडी, त्यांचे चित्रपट याविषयी कितीही बोललं तरी कमीच. अशा या अतिशय लोकप्रिय जोडीवर चित्रीत कमालीच्या लोकप्रिय गाण्यातील काही दृश्य पुन्हा साकारत एका नव्या सेलिब्रिटी जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पहिल्याच चित्रपटातून एकत्र स्क्रीन शेअर करणारी ही जोडी आहे, जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर. 

'धडक' या चित्रपटातून जान्हवी आणि ईशान रुपेरी पडद्यावर एकत्र झळकले होते. ज्यानंतर त्यांची मैत्री आणि मैत्रीपलीकडचं नातंही विशेष चर्चेचा विषय ठरलं. अशा या जोडीने राज कपूर आणि नर्गिस यांच्या 'प्यार हुआ इकरार हुआ' या गाण्यातील काही दृश्य सादर केली. मनिष पॉलच्या एका कार्यक्रमात त्यांचा हा अंदाज पाहायला मिळाला होता. 

फक्त जुन्या काळातीलच चित्रपटाचं दृश्य नव्हे, तर 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातील करवा चौथचं दृश्यही या दोघांनी नव्या अंदाजात सादर केलं. यावेळी प्रेक्षकांनी त्यांच्या या कलेची चांगलीच दाद दिली. अभिन. विश्वात सुरुवातीच्या काळात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे हे दोन्ही कलाकार येत्या काळतही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. 

येत्या काळात इशान 'खाली पिली' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, जान्हवीच्या हातात 'द कारगिल गर्ल', 'दोस्ताना २' आणि 'तख्त' असे मोठे चित्रपट आहेत.