... म्हणून काजोलनं घेतला देश सोडण्याचा निर्णय

कोरोनाच्या संकटातच काजोलचा मोठा निर्णय   

Updated: Sep 1, 2020, 07:37 PM IST
... म्हणून काजोलनं घेतला देश सोडण्याचा निर्णय  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : गेल्या बऱ्याच महिन्यांपासून कोरोना व्हायरसनं साऱ्या जगात थैमान घातलं आहे. भारतातही याचे पडसाद पाहायला मिळाले. दर दिवशी झपाट्यानं वाढणारी रुग्णसंख्या पाहता भारतात मार्च महिन्यायपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. असं असलं तरीही सध्या इतर राष्ट्रांमध्ये मात्र कोरोना काहीसा आटोक्यात येत असतानाच अनेक व्यवहार पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्या कारणास्तव अभिनेत्री काजोल हिनं परदेशात जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

ऐन कोरोना संकटादरम्यान काजोलनं हा निर्णय़ का घेतला असाच निर्णय अनेकांना पडत आहे. पण, त्यासाठी कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही. सर्व परिस्थितीचा विचार करत त्यानंतरच काजोलनं हा निर्णय घेतल्याचं कळत आहे. 

मुलगी न्यासा हिचं शिक्षण पुन्हा सुरु होत असल्यामुळं पुढील काही महिन्यांसाठी काजोल सिंगापूरमध्ये असणार आहे. भारतात लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी न्यासा ही भारतातत परतली होती. काही महिने कुटुंबासोबत व्यतीत केल्यानंतर आता ती पुन्हा सिंगापूरला जात आहे.

 

सध्याची एकंदर परिस्थिती पाहता न्यासाला अशा वेळी काजोल आणि तिचे कुटुंबीय एकटं सोडू इच्छित नाहीत. त्यामुळंच काजोलनं तिच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार काजोल आणि अजयनं सिंगापूरमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केलं आहे. न्यासाचं शिक्षण सुरु झाल्यापासूनच त्यांनी ही व्यवस्था केली होती. जेणेकरुन तेसुद्धा तिची भेट घेऊ शकतात. थोडक्यात कोरोना काळात मुलीला कुटुंबाची उणीव भासू नये यासाठीच काजोलनं काही महिन्यांसाठी देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे.