मुंबई : सहसा बाळाच्या जन्मानंतर महिलांच्या शरीरात प्रचंड बदल होताना दिसतात. या बदलांना सोप्या पद्धतीनं स्वीकृती मिळते असं नाही. असं असलं तरीही काही महिला मात्र प्रसूतीनंतरच्या काळात बाळासोबतच स्वत:कडेही लक्ष देताना दिसतात. आता ते कसं शक्य होतं, याचं गणित त्याच जाणतात.
मुलीच्या जन्मानंतर आपल्या शरीराची आणि आरोग्याची काळजी घेत स्वछंदी आयुष्य जगणाऱ्या अशाच एका अभिनेत्रीचं सध्या अनेकजण कौतुक करताना दिसत आहेत. (Bollywood Actress Kalki Koechlin shares beach bikini look)
निमिट्ट ठरतंय ते म्हणजे तिनं सोशल मीडियावर शेअर केलेले काही फोटो. ही अभिनेत्री आहे, कल्की कोचलीन. तिनं नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती समुद्रकिनारी एका लाकडाच्या ओंडक्यावर झुला घेताना दिसत आहे.
झाडाला टांगलेला ओंडका, त्यावर उभी असणारी बिकीनी लूकमध्ये दिसणारी कल्की सर्वांच्या काळजाचा ठाव घेत आहे. स्वच्छंदी झोका घेत असताना समाजाच्या बंधनांचे आणि न्यूनगंडांचे सर्व पाश तिनं तोडले आणि मनमुराद आनंद घेतला.
कल्कीनं कायमच तिच्या परखड भूमिका स्पष्टपणे मांडल्या. दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्याशी तिनं काही वर्षांपूर्वी तिनं लग्न केलं होतं. पण, तिचं हे नातं यशस्वी ठरु शकलं नाही. अनुरागपासून वेगळं झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी कल्कीनं गाय हर्षबर्ग याच्याशी असणारं नातं सर्वांसमोर आणलं. याच नात्यात तिनं एका मुलीलाही जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतरही कल्कीनं तिच्यात दडलेलं मूल मात्र हरवू दिलेलं नाही.