close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

छोट्या पडद्यावरील पदार्पणातच करीनाच्या मानधनाचा आकडा ऐकून व्हाल थक्क

दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा या कलाकारांच्या यादीच अभिनेत्री करिना कपूर हिसुद्धआ तिचं स्थान टिकवून आहे.

Updated: May 27, 2019, 04:00 PM IST
छोट्या पडद्यावरील पदार्पणातच करीनाच्या मानधनाचा आकडा ऐकून व्हाल थक्क

मुंबई : दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा या कलाकारांच्या यादीच अभिनेत्री करिना कपूर हिसुद्धआ तिचं स्थान टिकवून आहे. एक आई, मुलगी, पत्नी आणि बहीण म्हणून करीना तिची जबाबदारी पार पाडत आहेच. पण, सोबतच एक अभिनेत्री म्हणूनही तिने या कलाविश्वात स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. चित्रपटांमध्ये विविध भूमिकांना न्याय देणाऱ्या करिनाने एका रेडिओ शोच्या सूत्रसंचालनचीही जबाबदारी खांद्यांवर घेतली होती. 

महिलांना केंद्रस्थानी ठेवणारा तिचा रेडिओ शो प्रचंड गाजला होता. ज्यामागोमाग बी- टाऊनची ही बेगम आता आणखी एका नव्या कारकिर्दीसाठी सज्ज झाली आहे. 'डान्स इंडिया डान्स' रिऍलिटी शोमध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेत दिसेल. तिला साथ देणार आहेत, बॉस्को मार्टीस आणि रॅपर रफ्तार. 'डान्स इंडिया डान्स'चं हे सातवं पर्व आहे. ज्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक सहभागी होणार आहेत. नुकताच या शो चा एक प्रोमोही प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात आला. 

करिनाचं कलाविश्वातील एकंदर स्थान पाहता तिने या कार्यक्रमासाठी तगड्या मानधनाची मागणी केल्याचं कळत आहे. प्रत्येक भागासाठी तिने अडीच ते तीन कोटी रुपयांच्या मानधनाची मागणी केल्याच चर्चा गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. तीन महिन्यांसाठी चालणाऱ्या या कार्यक्रमात २५ ते २८ भाग असणार आहेत. प्रत्येक दिवशी एकूण दोन भागांचं चित्रीकरण पूर्ण होणार आहे. तिच्या मानधनाचा अधिकृत आकडा अद्यापही समोर आलेला नाही. पण, चर्चेत असणारा आकडा मात्र अनेकांना थक्क करुन जात आहे. तेव्हा आता बेगम करीनाची मानधनाची मागणी कार्यक्रमाचे निर्माते पूर्ण करु शकणार का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.