close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

...अन् कतरिनाची अदा पाहून सलमानही भारावला

कतरिना अशी काही थिरकली की....   

Updated: Sep 22, 2019, 12:06 PM IST
...अन् कतरिनाची अदा पाहून सलमानही भारावला

मुंबई : कलाविश्वात तग धरुन राहायचं असेल तर, स्वत:कडे असणाऱ्या कलांमध्ये प्राविण्य मिळणं हेसुद्धा तितकच महत्त्वाचं. अभिनेत्री कतरिना कैफ हिने याच बळावर इतकी वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचं काम सुरु ठेवलं आहे. 'शीला की जवानी', 'चिकनी चमेली', 'कमली' अशा गाण्यांवर कतरिना थिरकली आणि प्रेक्षकांच्या काळजाचा ठोकाच चुकला. 

फक्त अभिनय आणि सौंदर्यच नव्हे, तर तिने नृत्य कौशल्याच्या बळावरही आपलं वेगळं स्थान या चित्रपट वर्तुळात अबाधित ठेवलं आहे. तसं पाहिलं तर, विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने कतरिना तिच्या नृत्याची झलक दाखवते. पण, यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये मात्र तिचीच जादू पाहायला मिळाली. खुद्द सलमान खानही तिच्या या परफॉर्मन्ससाठी उत्सुक होता. किंबहुना परफॉर्मन्स पाहताना त्याच्या चेहऱ्यावरील भारावलेले भाव अनेकांचं लक्षही वेधून गेले. 

 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

खुद्द कतरिनानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या सोहळ्यातील नृत्याची एक झलक असणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सरावामध्ये तिने नेमकी कशी मेहनत घेतली इथपासून ते मुख्य सोहळ्यात तिने व्यासपीठावर कशा प्रकारे एकच जादू केली याची अप्रतिम झलक पाहायला मिळत आहे. 

 
 
 
 

SALMAN'S Reaction On KATRINA'S Entry #iifa Sal-Kat Moment --- Bhai? Bhai! @beingsalmankhan . . #iifa20 #iifahomecoming #nexaexperience purple Bollywood  love song. ....... #dabbang @s_a_y_e_b #dabbang3 #dabbang3 @aliabbaszafar @atulreellife #BhushanKumar @katrinakaif @tabutiful @apnabhidu @sonalikul @dishapatani @whosunilgrover @norafatehi @iaasifsheikhofficial @shreyaghoshal @vishaldadlani @shekharravjiani @nakash_aziz @kamil_irshad_official @vaibhavi.merchant @nikhilnamit @reellifeproduction @skfilmsofficial @tseries.official #SalmanFcAssam . @_s_a_y_e_b #beingsalmankhan #salman #beingsalmankhanfans #salmankhan #salmankhanturkey #bharat #salmankhanfanturkey #salmaniacs #salmankhanrules #salmankhanfans #salmankhanmerijaan #beingsalman #beingintouch #salmankhangoldenheart #salmankhanworldwidefans #salmansmile #bajrangibhaijaan #salmanspreadslove #salmankhanworldwidefans

A post shared by  (@b_e_i_n_g_salmanic) on

'सुरैय्या' या गाण्यावर थिरकणारी कतरिना पाहून, नकळत आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य येऊन आपलेही पाय थिरकू लागत आहेत. त्यामुळे आता तिचा हा पूर्ण परफॉर्मन्स पाहण्यासाठीच चाहत्यांना उत्सुकता लागलेली आहे.