Katrina Kaif Vicky Kaushal Wedding: लग्नाआधी कतरिनाच्या सासऱ्यांनी 'अशी' जपली माणुसकी

शाम कौशल हे आपल्या संपूर्ण कुटुंबासह विवाहस्थळी रवाना होणार होते. पण ...

Updated: Dec 6, 2021, 10:33 AM IST
Katrina Kaif Vicky Kaushal Wedding: लग्नाआधी कतरिनाच्या सासऱ्यांनी 'अशी' जपली माणुसकी
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरीना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाचीच चर्चा सुरु आहे. लग्न कुठे आणि कसं होणार, इथपासून लग्नासाठी कोण पाहुणे येणार इथपर्यंत प्रत्येक गोष्टीबाबत चाहत्यांनी कुतूहल व्यक्त करण्यास सुरुवात केली. 

मागच्या महिनाभरापासून माध्यमांनीही विकी- कतरिनाच्या लग्नावर चर्चा सुरु केली आहे. 

दोघांचीही कुटुंब लग्नाच्या तयारीमध्ये व्यग्र असताना आता म्हणे कतरिनाच्या होणाऱ्या सासऱ्यांनी, म्हणजेच शाम कौशल यांनी केलेली कृती सर्वांच्या नजरा वळवताना दिसत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार शाम कौशल हे आपल्या संपूर्ण कुटुंबासह विवाहस्थळी रवाना होणार होते. पण ही मंडळी घर सोडण्याआधीच तिथे छायाचित्रकरांनी गर्दी केली होती. 

लग्नाशी संबंधित कोणतीही घडामोड सुटू नये, यासाठीच त्यांचा हा आटापिटा सुरु होता. 

घराबाहेर ही गर्दी असतानाच विकीचा भाऊ सनी आणि वडील शाम कौशल यांनी ड्रायवरच्या जोडीनं तिथे असणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी स्टार्टसची सोय करत त्यांच्या खाण्यापिण्याला प्राधान्य दिलं. 

कॅमेऱ्याला परवानगी नसतानाही विकी-कतरिनाच्या लग्नातला पहिला फोटो समोर

 

साधारण महिन्याभर आधीपासूनच राजस्थानमध्ये विकी- कतरिनाच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. सध्या ही तयारी शेवटच्या टप्प्यात आली 
आहे. 

विविध कार्यक्रम, काही सेलिब्रिटींचे परफॉर्मन्सही या लग्नादरम्यान असणार आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं हा विवाहसोहळा धमाकेदार असणार आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.