कॅमेऱ्याला परवानगी नसतानाही विकी-कतरिनाच्या लग्नातला पहिला फोटो समोर

गुपचूप लग्न करण्याचं ठरवलं, तरीही विकी-कतरिनाचा फोटो समोर आला तरी कसा?

Updated: Dec 6, 2021, 09:07 AM IST
कॅमेऱ्याला परवानगी नसतानाही विकी-कतरिनाच्या लग्नातला पहिला फोटो समोर

मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कौफच्या लग्नाची लगबग सध्या सुरू आहे. रोज त्यांच्या लग्नाबाबात नव-नवीन गोष्टी समोर येत आहेत. खास लोकांच्या उपस्थित हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या लग्न सोहळ्यात सेल्फी आणि फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. पण लग्ना आधी विकी आणि कतरिनाचा एक फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. विरल भयानी नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. 

शेअर करण्यात आलेला फोटो एडिट करण्यात आल्याचं कळत आहे. फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, 'लग्नात परवानगी नाही पण फक्त डोक अशी खेळी करू शकतं.' असं लिहिलं आहे. सोशल मीडियावर विकी-कतरिनाच्या लग्नाच्या कपड्यातील खोटा फोटो व्हायरल होत असला, तरी चाहत्यांना त्यांच्या लग्नाचा खरा फोटो पाहायचा आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कतरिना कैफच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, विकी आणि कतरिना 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा रिसॉर्टमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. 

लव्हबर्ड्स हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करतील. 7 व 8 डिसेंबर रोजी संगीत व मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे. दोघांच्या चाहते त्यांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. पण विकी आणि कतरिना खरंच लग्न करणार आहेत की नाही हे येणारा काळचं ठरवेल.