Vicky-Katrina Wedding : जाणून घ्या, Mrs. Kaushal होणाऱ्या कतरिनाचं खरं नाव

सर्वच माहिती चाहत्यांना थक्क करु लागली आहे.   

Updated: Dec 8, 2021, 04:31 PM IST
Vicky-Katrina Wedding : जाणून घ्या, Mrs. Kaushal होणाऱ्या कतरिनाचं खरं नाव title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. 9 डिसेंबरला ही जोडी एकमेकांची कायमस्वरुपी जोडीदार होणार आहे. तर, यापूर्वी या दोघांविषयीची सर्वच माहिती चाहत्यांना थक्क करु लागली आहे. 

विकी- कतरिना लग्नाच कोणत्या लूकमध्ये दिसणार इथपासून त्यांच्या कुटुंबीयांपर्यंतची सर्वच माहिती सोशल मीडियामुळे उपलब्ध झाली आहे.

असंख्य व्हिडीओ आणि फोटोंमध्ये आता एक अत्यंत रंजक माहिती लक्ष वेधत आहे. 

ही माहिती म्हणजे कतरिनाची खरी ओळख. तिच्याबाबतचं हे सत्य फार कमीच लोकांना ठाऊक असावं. 

इतर अनेक सेलिब्रिटींप्रमाणे कतरिनाने तिचं आडनाव बदललं होतं. कतरिनानं नाव बदलण्यामागे एक महत्त्वाचं कारणंही आहे. 

तुम्हारा हूँ मै और तुम मेरी... कतरिनावर खिळली विकीची नजर; Romantic Video व्हायरल 

 

एका मुलाखतीमध्ये तिनं याचा उल्लेख केला आहे. याबाबत सांगताना, 'पासपोर्टमध्ये माझं नाव टरकोटे असं आहे. मी नाव यासाठी बदललं कारण, लोक त्याचा उच्चार अगदी सहजपणे करु शकतील. 

कतरिनानं तिचं नाव बदललं त्यावेळी यामध्ये तिनं वडिलांचं नाव, कैफ हे कायम ठेवलं'. 

2003 मध्ये करिअरची सुरुवात 
जवळपास 18 वर्षांपूर्वी कतरिनानं अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. 2003 मध्ये तिचा चेहरा सर्वांसमोर झळकला होता. 'बूम' हा तिचा पहिला चित्रपट होता. 

कतरिनाच्या पहिल्या चित्रपटाला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. यानंतर ती, 'मैने प्यार किया' या चित्रपटातून लोकप्रिय झाली. 

सलमान खान आणि अक्षय कुमार या कलाकारांसोबत तिची केमिस्ट्री विशेष गाजली. रुपेरी पडदा गाजवणारी हीच कॅट आता विकीसोबत तिची आयुष्यभराची केमिस्ट्री गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.