तुम्हारा हूँ मै और तुम मेरी... कतरिनावर खिळली विकीची नजर; Romantic Video व्हायरल

त्यांचं हे नातं किती गोड आहे याचीच जाणीव होत आहे... 

Updated: Dec 8, 2021, 10:09 AM IST
तुम्हारा हूँ मै और तुम मेरी... कतरिनावर खिळली विकीची नजर; Romantic Video व्हायरल

मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल सहजीवनाच्या प्रवासाची सुरुवात करण्याला आता अवघे काही क्षण शिल्लक आहेत. प्रेमाचा त्यांचा प्रवास सुरु झाला याची कोणाला शंकाही आली नाही. पण, अखेर हे प्रेम जिंकलं आणि ही जोडी लग्नाच्या टप्प्यापर्यंत येऊन ठेपली. 

विकी आणि कतरिनाच्या लग्नाचे क्षण जसजसे जवळ येऊ लागले आहेत, तसतसं त्यांच्या चाहत्यांकडून अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले जाऊ लागले आहेत.

असाच एक गोड रोमँटिक व्हिडीओ सर्वांच्याच नजरा खिळवत आहे.

विकी आणि कतरिनाचे एकत्र असे फारसे फोटो नसले तरीही त्यांचा एक व्हिडीओ मात्र या जोडीची केमिस्ट्री सर्वांसमोर आणत आहे. 

काही मुलाखती आणि पुरस्कार सोहळ्यांच्या निमित्तानं विकी आणि कतरिनानं स्क्रीन शेअर केली होती. 

अशाच क्षणांना एकत्र आणत त्याचा एक व्हिडीओ साकारण्यात आला आहे. यामध्ये 'तुम्ही देखो ना, ये क्या हो गया...' हे गाणं आणि त्याजोडीनं समोर येणारे विकी- कॅटचे काहीखा क्षण पाहताना मनावर हळुवरा वाऱ्याची फुंकर घातल्याची जाणीव होते. 

दरम्यान, या व्हिडीओमधून लक्ष हटलं तर महत्त्वाची बाब ही की आता बॉलिवूडच्या या बहुप्रतिक्षित विवाहसोहळ्यासाठी बऱ्याच सेलिब्रिटींनी जयपूरची वाट धरली आहे. 

परदेशातून कतरिनाचे कुटुंबीयसुद्धा भारतात आले आहेत. तेव्हा आता या लग्नसोहळ्याचा पहिला फोटो केव्हा समोर येतो हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.