मलायकाची चूक हेरण्यात अर्जुन यशस्वी होताच...

पाहा ती नेमकी कशी व्यक्त झाली..... 

Updated: Jun 19, 2019, 08:48 AM IST
मलायकाची चूक हेरण्यात अर्जुन यशस्वी होताच...

मुंबई : 'लाईट्स- कॅमेरा- अॅक्शन' याभोवतीच अभिनेते किंवा अभिनेत्रींचं आयुष्य फिरत असतं. अशा या व्यग्र वेळापत्रकातून वेळ मिळाल्यानंतर सेलिब्रिटी अनेकदा आधार घेतात तो म्हणजे सोशल मीडियाचा. अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा या सेलिब्रिटीनेही याच वाटा धरल्या. 

इन्स्टाग्रामवर एका पोस्टमध्ये त्यांच्यात झालेला संवाद पाहता याचा प्रत्यय येत आहे. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या मलायकाने #tuesdayteachings असा हॅशटॅग वापरत पाच टप्प्यांमध्ये केसांचा पोनीटेल कसा बांधायचा याची कृती दाखवली. पाच फोटोंच्या माध्यमातून तिने ही पोस्ट शेअर केली. पहिल्या फोटोपासून तिसऱ्या फोटोपर्यंत आता मलायका सुरेख केस बांधलेला लूक दाखवणार असं वाटत असताना पाचव्या फोटोवरही निराशाच होत आहे. 

मलायकाच्या याच पोस्टमधील ही चूक हेरत तिच्या बहुचर्चित प्रियकराने म्हणजेच अभिनेता अर्जुन कपूर याने एक कमेंट केली आहे. पाच फोटोंनंतरही तू पोनीटेल बांधू शकलेली नाहीस...., अशा आशयाची कमेंट त्याने केली. 

अर्जुनच्या या कमेंटवर 'अच्छाssss', असं लिहित मलायकाने अस्सल प्रेयसीच्या रुपात उत्तर दिलं. या सेलिब्रिटींमध्ये झालेला हा संवाद पाहता त्यांच्या रिलेशनशिपचा आणखी एक धमाल पैलू सर्वांसमोर आला आहे. फक्त माध्यमांसमोरच नव्हे तर, आता सोशल मीडियावरही अर्जुन आणि मलायका तितक्याच मोकळेपणाने व्यक्त होऊ लागले आहेत.