IND VS AUS 1st Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) च्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार असून यांच्यातील पहिला सामना शुक्रवार 22 नोव्हेंबर पासून पर्थ येथे खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी टॉस जिंकून फलंदाजी निवडलेल्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी घाम फोडला. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया अवघ्या 150 धावांवर ऑल आउट झाली. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क, हेझलहूड, कमिन्स यांच्या बॉलिंग समोर टीम इंडिया (Team India) फार काळ मैदानात टिकू शकली नाही. टीम इंडियाकडून केएल राहुल (26), पंत (37), ध्रुव जुरेल (11), नितीश रेड्डी (41) वगळता इतर फलंदाजांना दोन अंकी धावसंख्या सुद्धा करता आली नाही. विराट कोहली (Virat Kohli) तर अवघ्या 5 धावांवर ऑल झाला. यावरून आता टीम इंडियाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.
भारताचा युवा फलंदाज सरफराज खान याने 2024 मध्ये इंग्लंड विरुद्ध राजकोट टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यात त्याने 200 धावा केल्या यात तीन अर्धशतक झळकावली. यानंतर न्यूझीलंड सीरिजमध्ये देखील त्याने बंगळुरूमध्ये टीम इंडिया संकटात असताना १५० धावा करून टेस्टमधील पहिलं शतक ठोकले. सरफराजच्या परफॉर्मन्समुळे भारतीय टेस्ट टीममधील त्याच ६ नंबरच स्थान जवळपास पक्क समजलं जात होतं मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यात सरफराजला संधी देण्यात आली नाही. त्याच्या ऐवजी ध्रुव जुरेल याचा प्लेईंग ११ मध्ये समावेश करण्यात आला. भारतीय संघाच्या मॅनेजमेंटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पर्थ टेस्ट सामन्यात सरफराजचा पत्ता कापला. तर त्याऐवजी संधी दिलेला ध्रुव जुरेल मात्र पहिल्या इनिंगमध्ये केवळ 11 धावांवर ऑल आउट झाला.
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि भारतीय संघचं मॅनेजमेंट हे टीम इंडियात विविध प्रयोग करत आहेत, ज्याचा प्रभाव खेळाडूंच्या खेळावर होत असल्याचे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. सरफराज खान असा अनेक खेळाडू आहे जो टेस्ट क्रिकेटमध्ये मोठी इनिंग खेळण्याचा टेम्परामेंट ठेवतो. इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टेस्ट सामन्यात सरफराजने अनेकदा संकटात सापडलेल्या भारतीय संघाला मोठी खेळी करून बाहेर काढलं. त्यामुळे सरफराजने टेस्ट संघामध्ये आपलं स्थान जवळपास निश्चित केलं होतं.
हेही वाचा : मोठी बातमी! 'या' तारखेला सुरु होणार IPL 2025, BCCI ने पुढच्या 3 सीजनबाबत घेतला निर्णय
रोहित शर्मा अनुपस्थित असल्याने जसप्रीत बुमराह पहिल्या टेस्ट टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये यावेळी मोठा बदल दिसून आला आहे. या सामन्यात दोन तरुण खेळाडूंना प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाल्याने रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना बाहेर बसावे लागले आहे. नितीश रेड्डी आणि हर्षित राणा या दोन खेळाडूंनी भारताकडून कसोटी पदार्पण केले आहे. नितीश रेड्डी आणि हर्षित राणा प्लेइंग-11 मध्ये आल्याने रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना बाहेर बसावे लागले आहे.
केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर) , ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.
उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकिपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड