#freedomtofeed : बाळाला स्तनपान करणाऱ्या अभिनेत्रीला पाहून, नेटकऱ्यांनी सोडली मर्यादा

एका पोस्टवर नेटकऱ्यांच्या धक्कादायक कमेंट्स

Updated: Oct 27, 2021, 01:22 PM IST
#freedomtofeed : बाळाला स्तनपान करणाऱ्या अभिनेत्रीला पाहून, नेटकऱ्यांनी सोडली मर्यादा
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : नवजात बाळासाठी स्तनपान किती महत्त्वाचं आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. बाळासाठी आईचं दूध हे अमृतच. स्तनपान करणाऱ्या मातेकडे पाहण्याचा अनेकांचाच दृष्टीकोनही फारच भावनिक असतो. पण, एक वर्गही असा आहे जो या साऱ्याला अपवाद ठरत आहे. या वर्गाकडून अनेकदा अशा मुद्द्यांची खिल्ली उडवली जाते. सध्या एका बॉ़लिवूड अभिनेत्रीला या मानसिकतेचा सामना करावा लागला आहे. 

ही अभिनेत्री आहे नेहा धुपिया. नेहानं नुकताच एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला. या फोटोमध्ये ती बाळाला स्तनपान करताना दिसत आहे. असं करत असताना तिनं बाळाचा चेहरा मात्र झाकला आहे. 

नेहानं हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच काही चाहत्यांनी तिच्या या फोटोला दाद दिली.

काहींनी मात्र या अभिनेत्रीच्या फोटोवर विचित्र कमेंट करत तिची खिल्ली उडवली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

तू हे काय करतेयस, हे तुला शोभत नाही वगैरे... अशा अनेक कमेंट तिच्या या फोटोवर करण्यात आल्या. 

नेहानं या फोटोसोबत कॅप्शनमध्ये #freedomtofeed असा हॅशटॅग जोडला खरा. पण, खरंच समाजाची मानसिकता कधी बदलणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे हेच तिच्या पोस्टवरील प्रतिक्रिया पाहताना लक्षात येत आहे.