PHOTOS : शुभेच्छांचा स्वीकार करत निक-प्रियांका जोधपूरला रवाना

 हे दोघंही माध्यमांच्या आणि चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत आहेत. 

Updated: Nov 29, 2018, 11:54 AM IST
PHOTOS : शुभेच्छांचा स्वीकार करत निक-प्रियांका जोधपूरला रवाना

मुंबई : 'देसी गर्ल' म्हणून हिंदी कलाविश्वात नावारुपास आल्यानंतर आंतरराष्ट्रीय मनोरंजन जगतातही आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत ती लग्नगाठ बांधणार असून, गेल्या काही दिवसांपासून प्रियांका आणि निकच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. 

जोधपूर येथे मेहरानगढ आणि उमेदभवन पॅलेस या ठिकाणी प्रियांका- निकच्या लग्नसोहळ्याचं आणि विविध समारंभांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्री वेडींग पार्टी, कुटुंबीयांसह शुभकार्य निर्विघ्न पार पडावं यासाठीची पूजा आणि इतरही सर्व कामं आटोपती घेत अखेर प्रियांका आणि निक त्यांच्या कुटुंबीयांसह जोधपूरसाठी रवाना झाले आहेत. 

निक आणि प्रियांकाचे विमानतळावरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या फोटोंमध्ये हे दोघंही माध्यमांच्या आणि चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत त्यांना हात जोडून अभिवादन करताना दिसत आहेत. 

जोधपूरला रवाना होतेवेळी प्रियांकाचा लूकही तितकाच लक्ष वेधी ठरला. सफेद रंगाचा स्लीट कुर्ता, प्लाझो, बांधणीची विविधरंगी ओढणी असा एकंदर लूक तिला शोभून दिसत होता. तर, निक लेदर जॅकेट, ट्राऊजरमध्ये मोठ्या रुबाबात तिच्यासोबत माध्यमांना अभिवादन करत होता. 

पुढचे काही दिवस कलाविश्वात प्रियांका-निकच्या लग्नसोहळ्याचीच हवा पाहायला मिळणार आहे. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणप्रमाणेच प्रियांकाचा विवाहसोहळाही दोन पद्धतींनी पार पडणार आहे. ख्रिस्ती धर्मपद्धती आणि हिंदू परंपरांनुसार ती आणि निक विवाहबद्ध होतील.