close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

प्रियांकासोबतच्या नात्याला एक वर्ष पूर्ण होताच निक म्हणाला....

त्याला उत्तर देत प्रियांकानेही..... 

Updated: May 26, 2019, 12:39 PM IST
प्रियांकासोबतच्या नात्याला एक वर्ष पूर्ण होताच निक म्हणाला....
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर ते अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांचं कानच्या रेड कार्पेटवर मोठ्या दिमाखात येणं, प्रेक्षकांसाठी ही जोडी नेहमीच खास ठरली. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या जोडीसाठी त्यांच्या सहजीवनात आणखी एक खास दिवस नुकताच येऊन गेला. हा दिवस खास होता, कारण साधारण वर्षभरापूर्वीच त्यांची पहिली डेट पार पडली होती. 

निकने त्याच खास दिवसाच्या काही आठवणी जागवत प्रियांकासोबतचा एक सुरेख फोटो पोस्ट केला होता. एक वर्षापूर्वी आपण ज्या व्यक्तीला, महिलेला भेटलो ती माझी खूप खास मैत्रीण, माझा आत्मविश्वास, माझी पत्नी.... असं म्हणत निकने प्रियांकाचं त्याच्या आयुष्यातील नेमकं स्थान सर्वांसमोर ठेवलं. आपल्यातील सर्वात चांगल्या व्यक्तीला घडवण्यात प्रेरित करण्यासाठी म्हणून त्याने प्रियांकाचे आभार मानले. तर, तिचा पती असणं ही भाग्याची आणि आदराची बाब असल्याचंही तो या पोस्टच्या कॅप्शनच्या माध्यमातून म्हणाला. 

प्रियांकाप्रती भावना व्यक्त करत निकने त्यांच्या नात्याची सुरेख बाजू सर्वांसमोर ठेवली. त्याला उत्तर देत प्रियांकानेही निकवरील प्रेमाची ग्वाही देत आयुष्यातील सर्वात आनंददाही गोष्ट म्हणजे निकसोबतचं नातंच.... अशा भावना व्यक्त केल्या. चाहत्यांमध्ये निक्यांका या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जोडीची केमिस्ट्री खरंच एखाद्या परिकथेतील राजकन्या आणि राजकुमाराच्या कथेप्रमाणेच आहे, असं म्हणायला हरकत नाही.