'या' सुरेख स्मितहास्यासह प्रियांका कोणाचे आभार मानतेय?

आता हे काय नवं प्रकरण?

Updated: Oct 17, 2018, 04:10 PM IST
'या' सुरेख स्मितहास्यासह प्रियांका कोणाचे आभार मानतेय?

मुंबई: प्रियांका चोप्राच्याच नावाच्या चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये पाहायाला मिळत आहेत. या चर्चा अर्थातच तिच्या लग्नाविषयीच्या आहेत. गायक निक जोनाससोबत प्रियांका लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे सर्वत्र लगबग आहे. अशा या गोंधळाच्या तरीही उत्साहपूर्ण वातावरणात प्रियांका कोणाचेतरी मनापासून आभार मानत आहे.

आता ही 'देसी गर्ल' नेमके कोणाचे आभार मानतेय हाच प्रश्न तुम्हालाही पडलाय ना? 

खरंतर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी फार तर्क लावण्याची गरज नाही. कारण, खुद्द प्रियांकानेच एक व्हिडिओ पोस्ट करत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. 

ही 'देसी गर्ल' सध्या आभार मानतेय ते आसामचे. 

आता हे काय नवं प्रकरण, असं म्हणण्याआधी हा व्हिडिओ पाहा. 

ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात स्वच्छंदपणे सफर करणारी, हत्तींच्या पाठवर बसून फिरणारी, स्थानिकांमध्ये वावरणारी ही 'देसी गर्ल' चक्क आसामच्या प्रेमात पडली आहे. 

मुळात निसर्गाची मुक्तहस्ताने उधळण झालेलं हे ठिकाणं सर्वांवरच एक प्रकारची जादू करुन जातं. अशा या ठिकाणाला भेट दिल्यानंतर त्याच्याशी तुम्ही एक प्रकारे जोडले जाता. 

प्रियांकाच्या मनातही याच भावनांनी घर केल्यामुळे तिने चक्क आसामचेच आभार मानले आहेत. 

अवघ्या तीन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये आसामच्या निसर्गसौंदर्याचं, तिथल्या कलेचं, कलाकुसरीच्या वस्तूंचं सुरेख आणि प्रभावी चित्रण करण्यात आलं आहे.

प्रियांकालाही प्रेमात पाडणाऱ्या या 'ऑस्सम आसाम'ला तुम्ही कधी भेट देताय?