'गणपती बाप्पा मोरया' म्हणत परदेशात प्रियांकाने फोडला मुहूर्ताचा नारळ

आगामी चित्रपटाच्या सेटवरही ही प्रथा पाळली गेली. 

Updated: Oct 14, 2018, 03:13 PM IST
'गणपती बाप्पा मोरया' म्हणत परदेशात प्रियांकाने फोडला मुहूर्ताचा नारळ  title=

मुंबई: अभिनेत्री प्रियांका चोप्रा बराच काळ भारतात राहिल्यानंतर आता पुन्हा एकदा परदेशात गेली आहे. खासगी आयुष्य आणि चित्रपट जगतातील करिअर या दोन्ही गोष्टींमध्ये सुरेखरित्या मेळ साधणारी ही अभिनेत्री सध्या एका व्हिडिओमध्ये चर्चेत आली आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये मुहूर्ताचा नारळ फुटताना दिसत आहे. 

मुहूर्त या शब्दाचा उच्चार केल्यानंतर टवकारले ना तुमचेही कान? 

प्रियांका आणि तिचा प्रियकर निक जोनास येत्या काळात विवाहबंधनात अडकणार असल्याचं कळत आहे. त्यामुळे हा मुहूर्ताचा विषय त्यांच्या लग्नाशी तर जोडलेला नाही ना? असा पडणं सहाजिक आहे. 

पण, इथे चर्चा आहे ते म्हणजे प्रियांकाच्या आगामी चित्रपटाच्या परदेशातील मुहूर्ताची. 

कोणत्याही शुभकार्याआधी नारळ फोडून देवाकडे प्रार्थना करण्याची पद्धत भारतीय संस्कृतीत आहे. त्यामुळे मग प्रियांकाच्या आगामी चित्रपटाच्या सेटवरही ही प्रथा म्हणा किंवा आणखी काही. ती पाळली गेली. 

खुद्द प्रियांकानेच गणपती बाप्पा मोरया असं म्हणत सेटवर काही चुकीचं घडलं तर त्याची जबाबदारी माझी, असं म्हणत तिने नारळ फोडला. 

'द स्काय इज पिंक' या चित्रपटाच्या चित्रीकरणारासाठी प्रियांका परदेशात रवाना झाली आहे. भारतातील चित्रीकरण संपवल्यानंतर देसी गर्ल ही पुन्हा एकदा सातासमुद्रापार गेली असून, आता ती या चित्रीकरणावरच जास्त लक्ष केंद्रित करत आहे.