close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'देसी गर्ल'च्या लग्नसोहळ्याला 'या' विदेशी सेलिब्रिटीची खास उपस्थिती

प्रियांका आणि निकच्या परदेशी मित्रमंडळींनीही उपस्थिती लावण्यास सुरुवात केली आहे.

Updated: Nov 28, 2018, 04:05 PM IST
'देसी गर्ल'च्या लग्नसोहळ्याला 'या' विदेशी सेलिब्रिटीची खास उपस्थिती

मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नसोहळ्याच्या चर्चांच वादळ आलेलं असतानाच आता देसी गर्ल प्रियांका चोप्रासुद्धा विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. जोधपूरमध्ये मोठ्या दिमाखदार सोहळ्यात आणि राजेशाही थाटात ती अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. 

प्रियांकाच्या या लग्नसोहळ्यासाठी सध्या तिच्या आणि निकच्या परदेशी मित्रमंडळींनीही उपस्थिती लावण्यास सुरुवात केली आहे. एकिकडे निकचा भाऊ जो जोनास आणि सोफी टर्नर भारतात आलेले असतानाच दुसरीकडे आता  एक खास परदेशी सेलिब्रिटी या सोहळ्यासाठी भारतात येणार आहे. 

'देसी गर्ल'च्या विवाहसोहळ्याला येणारा हा खास सेलिब्रिटी म्हणजे अभिनेता ड्वेन जॉन्सन. पिंकव्हिलाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार प्रियांका आणि निकने ड्वेनलाही लग्नाचं आमंत्रण दिलं असून तोसुद्धा या सोहळ्याला हजर राहणार असल्याचं कळत आहे. 

Dwayne Has Worked With Nick & PeeCee

'द रॉक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ड्वेनने प्रियांकासोबत 'बेवॉच'मध्ये तर, निकसोबत 'जुमांजी' या चित्रपटामध्ये काम केलं आहे. त्यामुळे ड्वेन हा वधू आणि वर अशा दोन्ही पक्षांच्या बाजूने या सोहळ्यात सहभागी होणार आहे, असं म्हणायला हरकत नाही.