Priyanka Chopra Kids: अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा पती निक जोनास (Nick Jonas) या जोडीला कायमच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच या जोडीनं त्यांच्या लेकिचं स्वागत केलं. लेकिच्या येण्यानं प्रियांकाच्या जीवनाला खरा अर्थ मिळाला. आता म्हणे ती पुन्हा एकदा आई होण्याच्या तयारीला लागली आहे.
पहिली लेक थोडी मोठीही होत नाही, तोच प्रियांका खरंच पुन्हा आई होण्याच्या विचारात आहे का हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना?
हल्लीच एका मुलाखतीत प्रियांकानं केलेल्या वक्तव्यानुसार निक आणि ती एक मोठं कुटुंब तयार करण्याच्या तयारीत आहेत. मी आणि निक आम्हा दोघांनाही आपली खूप सारी मुलं असावीत असं वाटतं, असं प्रियांका म्हणाली.
11 मुलांची आई होणार प्रियांका ?
आपण 11 मुलांची आई होऊ इच्छितो असंही प्रियांकानं मुलाखतीमध्ये म्हटलं. अतिशय विनोदी अंदाजात मी क्रिकेट टीमच बनवू इच्छिते असं म्हणत त्यासाठी 11 मुलं लागतील यावर तिनं भर दिला.
2018 पासून निक - प्रियांकाच्या नात्याची सुरुवात
प्रियांका भारतीय कलाजगतात प्रसिद्धीझोतात आल्यानंतर तिनं आंतरराष्ट्रीय कलाजगताकडे आपला मोर्चा वळवला. पुढे अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत तिचं नाव जोडलं गेलं आणि त्या दोघांनीही लग्न करत या नात्याला नवं नावही दिलं. 2018 मध्ये ही जोडी विवाहबद्ध झाली.