मुंबई : अभिनेत्री राधिका आपटे ही कायमच काही आव्हानात्मक भूमिकांना न्याय देत असते. तिच्या या भूमिका प्रेक्षकांची मनं जिंकण्याऱ्या ठरतात. पण, अमुक एका प्रकारच्या भूमिका साकारल्यामुळे तिलाही त्याच प्रकारच्या भूमिकांचे प्रस्ताव येण्याच्या प्रकाराला सामोरं जावं लागलं होतं. एका कलाकारासाठी त्याच्याविषयीची तयार होणारी प्रतिमा सर्वतोपरी महत्त्वाची असते. किंबहुना त्या बळावर काही चित्रपटातील भूमिकांची त्यांना ऑफरही येते.
श्रीराम राघवनच्या 'बदलापूर' या चित्रपटातील एका बोल्ड दृश्यामुळे राधिकाला अशा अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं. तिने साकारलेल्या त्या बोल्ड दृश्यानंतर जणू अनेकांच्या मनात राधिकाप्रती एक वेगळा समज तयार झाला, आणि तिला अडल्ट, सेक्स कॉमेडी चित्रपटांतील भूमिकांसाठी विचारणा होऊ लागली. ज्या चित्रपटांचे प्रस्ताव तिने नाकारले होते.
'बॉलिवूड लाईफ'च्या वृत्तानुसार चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांचा दृष्टीकोन पटला नाही, तर तो चित्रपट नाकारण्याचा मार्गच राधिका अवलंबते. याचविषयी सांगताना ती म्हणाली, ''मी 'बदलापूर'मध्ये एक बोल्ड दृश्य साकारलं होतं. त्यानंतर 'अहिल्या' नावाच्या एका लघुपटातही काम केलं होतं. ज्यानंतर अमुक एका भूमिकांसाठीच मला विचारलं जाऊ लागलं. मला अनेकांचे विचारच पटत नव्हते. अनेकदा तर मला उगाचच वाटतं की आपलं कटू आणि विचित्र व्यक्तीमत्त्वं पाहता त्यामुळेच अनेक गोष्टी मला मिळालेल्या नाहीत.''
'तान्हाजी...' म्हणजे एक मोठा योगायोग- देवदत्त नागे
अनेकदा 'प्रगत' या शब्दाखाली काहीजण उगाचच काहीतरी लिहितात. असं सांगत पुरुषांचा द्वेष करणं हे काही प्रगतीशील असणाऱ्याचं लक्षण नाही. कथा हे एक माध्यम आहे. पण, एक लेखक, दिग्दर्शक तुम्हीली त्याकडे आपल्या दृष्टीने पाहता. त्यामुळे ते सादर करण्याची तुमची पद्धत आणि अर्थातच दृष्टीकोन माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मी जर त्या दृष्टीकोनाने सहमत नसेन तर मग मी तो चित्रपट नाकारते असं म्हणत राधिकाने तिचं म्हणणं स्पष्टपणे सर्वांसमोर ठेवलं.
आतापर्यंतच्या कारकिर्दीत राधिकाने 'पार्च्ड', 'फोबिया', 'मांझी- द माऊंटन मॅन', 'शोर इन द सिटी', 'लस्ट स्टोरिज' अशा चित्रपटांतून प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. राधिकाच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनीही चांगलीच दाद दिली आहे.