आपण जेवायला जायलाच हवं... वेगळ्याच उद्देशाने तो म्हणाला; अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

बॉलिवूड अभिनेत्रीकडून धक्कादायक प्रसंगाचं कथन 

Updated: Oct 15, 2019, 07:05 PM IST
आपण जेवायला जायलाच हवं... वेगळ्याच उद्देशाने तो म्हणाला; अभिनेत्रीचा गौप्यस्फोट title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई  : #MeToo  मोहिमेअंतर्गत बऱ्याच अभिनेत्रींनी कलाविश्वात त्यांना सामोरं जावं लागलेल्या काही प्रसंगांचं कथन केलं होतं. लैंगिक शोषण, अपमानास्पद आणि आक्षेपार्ह वर्तणूक या साऱ्याविषयी अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांनीही आवाज उठवला होता. यामध्येच आता या अनुभवांशी मिळताजुळता एक प्रसंग अभिनेत्री रिचा चड्ढा हिने सर्वांसमोर ठेवला आहे. 

'पिंकव्हिला'शी संवाद साधताना तिने, आपल्या कारकिर्दीतील एक असा प्रसंग सर्वांसमोर आणला जो ऐकून महिलांकडे इतरांच्या पाहण्याचा दृष्टीकोन नेमका असतो तरी कसा याचा पुन्हा एकदा प्रत्यय येत आहे. 

सुरुवातीच्या दिवसांविषयी सांगताना रिचा म्हणाली, ''एकदा एका ठिकाणी एक व्यक्ती माझ्याकडे आले. 'आपण जेवायला (डिनरला) गेलं पाहिजे', असं ते म्हणाले. त्यावर माझं जेवण झालं सर..., असं मी म्हणाले. मी पनीर, डाळ, दही रोटी, खाल्ली असं त्यांना सांगितलं. पण, त्यावर पुन्हा 'अगं नाही... नाही आपण जेवायला जायलाच हवं' असं ते पुन्हा म्हणाले. 'सर, मी जेवले.....' असं सांगत मी काय काय खाल्लं हे त्यांना सांगितलं. 'नव्हे.... आपण जेव्हायला गेलंच पाहीजे', असं म्हणत त्यांनी वेगळाच सूर आळवला. (दंडाला वेगळाच स्पर्श करत).''

'जेवणाचा' आग्रह धरण्याच्या त्या व्यक्तीने हे धाडस तिचे काकासुद्धा त्या ठिकाणी असतानाच केलं होतं. त्यांची ही कृत्य पाहता रिचाने काकांच्या नावाने बहाणा करत त्यांच्यापासून पळ काढला. कारकिर्दीत वेगळी ओळख प्रस्थापित केल्यानंतरही रिचाला या अशा प्रसंगांचा सामना करावा लागला होता. मुळात दैनंदिन जीवनातही अशा प्रसंगांचा सामना करावा लागतो. जे खरंतर होता कामा नये, असं म्हणत कलाविश्वात एक बाहरेचच व्यक्ती म्हणून येणं म्हणजे किती कठीण असतं यामागचं वास्तव समोर आणलं.