'हा ड्रेस नक्की कसा घातला असेल?', सैफच्या लेकिचा अती बोल्ड लूक पाहून चाहत्यांना प्रश्न

फक्त चित्रपटांमुळेच नव्हे, तर सारा तिच्या फॅशन सेन्समुळेही चर्चेचा विषय ठरु लागली. 

Updated: Jun 17, 2022, 11:47 AM IST
'हा ड्रेस नक्की कसा घातला असेल?', सैफच्या लेकिचा अती बोल्ड लूक पाहून चाहत्यांना प्रश्न  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री सारा अली खान, ही बॉलिवूडमधील नवोदित कलाकारांपैकीच एक. काही वर्षांपूर्वीच हिंदी चित्रपटांच्या दुनियेत सक्रिय झालेल्या सारानं तिच्या आई- वडिलांच्या म्हणजेच अमृता सिंग आणि सैफ अली खान यांच्या पावलावर पाऊल ठेवलं. (Bollywood Actress Sara Ali Khan Bold Photoshoot in black and white gown)

फार कमी वेळातच सारा प्रचंड लोकप्रिय झाली. तिच्या चाहत्यांचा आकडा दिवसागणिक वाढू लागला. फक्त चित्रपटांमुळेच नव्हे, तर सारा तिच्या फॅशन सेन्समुळेही चर्चेचा विषय ठरु लागली. 

दीपिका, अनुष्का आणि कतरिनालाही टक्कर देईल अशा लूकमध्ये तिला नुकतंच अनेकांनी पाहिलं. याचनिमित्तानं करण्यात आलेल्या फोटोशूटनंही तिनं सर्वांनाच भुरळ घातली. 

या नव्या लूकमध्ये सारा काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. सफेद रंगाची हलकी जोड  असणाऱ्या तिच्या या हाय स्लिट गाऊननं इंटरनेटवर धुमाकूळ घातला. 

साराचा कमनीय बांधा या गाऊनमधून स्पष्ट दिसला, तर तिच्या मादक रुपावर सर्वांच्या नजरा खिळल्या. पण, सर्वांनाच तिचा हा लूक भाळला असं नाही. 

काही नेटकऱ्यांनी साराच्या या अती बोल्ड फोटोवर निशाणाही साधला. हा ड्रेस हिनं नेमका कसा घातला असेल, असे प्रश्न करत काहींनी तिची खिल्लीही उडवली. 

असो, पण फॅशनच्या या दुनियेत साराचं हे रुप गाजतंय हे मात्र नाकारता येणार नाही. तुम्हाला कशी वाटली तिची ही अदा?