वडापाव तो बनता है भाऊ; पाहा बॉलिवूड अभिनेत्रीची खवैय्येगिरी

 काही ठिकाणं येतात जिथं वडापाव खाण्यासाठी खास गर्दी केली जाते

Updated: Nov 9, 2020, 10:36 AM IST
वडापाव तो बनता है भाऊ; पाहा बॉलिवूड अभिनेत्रीची खवैय्येगिरी

मुंबई : मुंबईकर आणि वडापाव हे एक अनोखं समीकरण. खिशाला परवडेल अशा दरात आणि भूक भागवेल अशा प्रमाणात हा पदार्थ समोर आला, की भल्याभल्यांना आवरणं कठीण. बरं हे समीकरण आता मुंबईपुरतंच मर्यादित राहिलेलं नसून, शहरापासून काहूसं दूर जातानाही वाटेत अशी काही ठिकाणं येतात जिथं वडापाव खाण्यासाठी खास गर्दी केली जाते. 
असंच एक ठिकाण म्हणजे कर्जत. 

मुंबईकरांसाठी एकदिवसीय सहलीचं, ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी गडकिल्ले सर करण्याचं असं निसर्गसौंदर्यानं नटलेलं हे ठिकाण. बरं यासोबतच हे ठिकाण ओळखलं जातं ते म्हणजे इथं मिळणाऱ्या वडापावसाठी. 

कायम संतुलित आहाराला प्राधान्य देणारी बॉलिवूडची एक सौंदर्यवतीसुद्धा या वडापाववर ताव मारण्यापासून स्वत:ला रोखू शकलेली नाही. ही अभिनेत्री आहे शिल्पा शेट्टी. 

सोशल मीडियावर शिल्पानं नुकताच एक व्हि़डिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती या जगप्रसिद्ध अशा पदार्थाचा मनापासून आनंद घेताना दिसत आहे. 

'चलते-चलते देखा वड़ा पाव, मन ने बोला संडे है... तो खाओ खाओ खाओ बनता है भाऊ', असं कॅप्शन लिहित कर्जतहून परतत असताना हे आपलं आवडीचं ठिकाण आहे. कारण इथं वडापाव फार उत्तम मिळतो असंही तिनं इथं लिहिलं. 

 

शिल्पानं पोस्ट केलेला हा व्हिडिओ पाहताना तिच्याच्या खऱ्याखुऱ्या वडापावप्रेमी व्यक्तीचीच झलक सर्वांपुढं येत आहे, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.