आणखी एका बॉलिवू़ड अभिनेत्रीच्या वैवाहिक नात्यात दुरावा

वर्षभराच्या नात्यानंतरच घेतला हा निर्णय 

Updated: Dec 10, 2019, 12:11 PM IST
आणखी एका बॉलिवू़ड अभिनेत्रीच्या वैवाहिक नात्यात दुरावा
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झा हिच्या वैवाहिक नात्यात आलेला दुरावा चर्चेचा विषय ठरत असतानाच आता आणखी एका अभिनेत्रीचं वैवाहित नातं अशाच वळणावर आल्याचं स्पष्ट होत आहे. ताश्कंद फाईल्स या चित्रपटातून झळकणारी ती अभिनेत्री म्हणजे श्वेता बासू प्रसाद. रोहित मित्तल याच्यासोबत असणाऱ्या तिच्या जवळपास एक वर्षाच्या वैवाहिक नात्यात दुरावा आला आहे. गेल्या वर्षीच डिसेंबर महिन्यात श्वेता आणि तिचा प्रियकर रोहित यांनी लग्नगाठ बांधली होती. 

सोशल मीडियाच्या मआध्यमातून तिने याबाबतची माहिती दिली. आपण दोघांनीही परस्पर सामंजस्याने या नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेत असल्याचं तिने या पोस्टच्या माध्यमातून सांगितल्याचं पाहायला मिळालं. 'रोहित आणि मी दोघांनीही परस्पर सामंजस्याने या नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय़ घेतला आहे. जवळपास महिनाभर विचार केल्यानंतर एकमेकांच्या हितासाठी हेच योग्य असण्याच्या निर्णयावर आम्ही पोहोचलो', असं तिने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं. 

Image result for Shweta Basu prasad wedding zee

काही पुस्तकांची सर्वच पानं वाचायचीच असतात असं नाही. यचा अर्थ असाही होत नाही, की ते पुस्तक वाईट आहे किंवा वाचण्याजोगं नाही. पण, काही गोष्टी या शेवटापर्यंत न नेता मध्येच सोडणंही तितकंच चांगलं असतं, असा अतिशय सुरेख दृष्टीकोन मांडत तिने रोहितले असंख्य आठवणींसाठी सहृदय आभार मानले. सोबतच त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. 

श्वेताची ही पोस्ट पाहता तिच्या मनाची भावनिक बाजू पाहायला मिळाली. चाहत्यांनी परिस्थितीचं गांभीर्य पाहता या क्षणी श्वेताला धीर दिला. मुळात यावेळी सोशल मीडियाच्याच माध्यमातून चाहते आणि तिचं एक नि:स्वार्थ नातंही पाहायला मिळालं.