close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सोनाक्षीच्या आगामी 'खानदानी शफाखाना'चं पोस्टर प्रदर्शित

'मैं जितना बोलूंगी लोगों को उतनी ही शर्म आनी है...'

Updated: Jun 19, 2019, 08:17 PM IST
सोनाक्षीच्या आगामी 'खानदानी शफाखाना'चं पोस्टर प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूड दबंग गर्ल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या आगामी 'खानदानी शफाखाना' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने या चित्रपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

सोनाक्षीने ट्विटरवरुन 'खानदानी शफाखाना'चं पोस्टर शेअर केलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सोनाक्षीचा एकटीचा संपूर्ण चेहरा दिसत आहे. तर पोस्टरवरील इतर कलाकारांचे चेहेरे वर्तमानपत्र, बॅगच्या मागे लपवलेले दिसत आहेत. पोस्टरच्या शेवटी 'मैं जितना बोलूंगी लोगों को उतनी ही शर्म आनी है' असं लिहिलेलं असून सोनाक्षीनेही ट्विट करताना हेच कॅप्शनही दिलं आहे. चित्रपटात सोनाक्षी 'बेबी बेदी' ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. 

या ट्विटमधून तिने चित्रपटाचा ट्रेलर पुढील दोन दिवसांत प्रदर्शित होणार असल्याचंही म्हटलं आहे. 

चित्रपटात सोनाक्षीव्यतिरिक्त वरुण शर्मा, अन्नू कपूर, रॅपर बादशाह हे कलाकारही भूमिका साकारणार आहेत. शिल्पी दासगुप्ता दिग्दर्शित 'खानदानी शफाखाना' चित्रपट येत्या २६ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.