सोनम कपूरचं मधुबाला कनेक्शन माहितीये?

 'साहिबे आलम' म्हणणारी 'अनारक'ली आजवर कोणीही विसरु शकलेलं नाही. 

Updated: Nov 2, 2019, 10:52 AM IST
सोनम कपूरचं मधुबाला कनेक्शन माहितीये?  title=
सोनम कपूरचं मधुबाला कनेक्शन माहितीये?

मुंबई : 'शहजादा सलीम'ला 'साहिबे आलम' म्हणणारी 'अनारक'ली आजवर कोणीही विसरु शकलेलं नाही. रुपेरी पडद्यावर हीच पात्र साकारणाऱ्या अभिनेता दिलीप कुमार आणि अभिनेत्री मधुबाला यांनी 'मुघल-ए-आझम' या चित्रपटातून या भूमिका साकारल्या होत्या. एका वेगळ्याच प्रेमकहाणीला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या या चित्रपटाची लोकप्रियता आजही कायम आहे. 

इतक्या वर्षांनंतरही 'सलीम' आणि 'अनारकली' चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत. याची झलक पाहायला मिळाली ती म्हणजे अभिनेत्री सोनम कपूर हिच्या एका सोशल मीडिया पोस्टवरुन. सोनमने पोस्ट केलेले हे फोटो पाहून मधुबाला, दिलीप कुमार आणि एकंदरच 'मुघल-ए-आझम' या चित्रपटाशी असणारं तिचं एक वेगळं कनेक्शन समोर आलं आहे. याला निमित्त ठरली ती म्हणजे 'हॅलोविन २०१९'च्या निमित्ताने आयोजित केलेली एक पार्टी. 

'हॅलोविन' पार्टीच्या निमित्ताने सोनम कपूर आणि तिचा पती, आनंद अहूजा या दोघांनीही 'मुघल-ए-आझम'मधील दोन्ही महत्त्वाच्या पात्रांप्रमाणे वेश केला होता. 'अनारकली'च्या रुपात दिसणाऱ्या सोनमला पाहताच अनेकांना मधुबाला यांनी साकारलेली रुपवान 'अनारकली' आठवली. हुबेहुब 'अनारकली'प्रमाणेच रुप धारण केलेल्या सोनमने यावेळी तिचं (अनारकलीचं) साखळदंडांमध्ये अडकलेलं रुप सर्वांसमोर आणलं. 

 
 
 
 

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on

 
 
 
 

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on

सोनमचा पती, म्हणजेच आनंद अहूजा हासुद्धा 'सलीम'च्या रुपात तिला शोभून दिसत होता. या दोघांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांच्या चेहऱ्यांवर असणारे भाव आणि तो वेश सादर करण्याचा त्यांचा अंदाज नेटकऱ्यांचीही मनं जिंकून गेला आहे. अनेकांनी कमेंट करत त्यांच्या या रुपाची प्रशंसा केली आहे. मुख्य म्हणजे बी- टाऊनच्या स्टायलिश जोड्यांपैकी एक अशा आनंद आणि सोनमच्या या रुपाने यावेळीसुद्धा थोडे हटके #StyleGoals आणि #CoupleGoals दिले, असं म्हणायला हरकत नाही.