गरोदरपणात सोनम कपूर का ठरतेय चर्चेचा विषय?

गरोदरपणातही तिनं तिचा संपूर्ण प्रवास चाहत्यांच्या भेटीला आणला

Updated: Jun 10, 2022, 01:37 PM IST
गरोदरपणात सोनम कपूर का ठरतेय चर्चेचा विषय?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सोनम कपूर हिनं तिच्या गरोदरपणाची बातमी चाहत्यांशी शेअर केली. सोनमनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आणि तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. (Sonam kapoor)

आता ही अभिनेत्री पुन्हा चर्चेत आली आहे ती एका नव्या कारणामुळे. सोनम सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. गरोदरपणातही तिनं तिचा संपूर्ण प्रवास चाहत्यांच्या भेटीला आणला. पण, तिची ही नवी पोस्ट जरा खास आहे. कारण इथं सोनम कोणा एका देवदूतासारखी दिसत आहे. (Bollywood Actress Sonam kapoor pregnancy photoshoot)

निमित्त आहे ते म्हणजे सोनमचं मॅटर्निटी फोटोशूट. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदिप खेासला यांचे डिझाईन तिनं फ्लाँट केलं. या फोटोंमध्ये सोनमचं BABY BUMP स्पष्ट दिसत आहे. 

मॅटर्निटी फोटोशूटसाठी सोनमनं (ऑफ व्हाईट बीडेड सॉटिन एम्बल) तलम कापडाच्या आऊटफिटला पसंती दिली. ज्यावर मोत्यांची सुरेख सजावट पाहायला मिळाली. लाँग टेल हेअरस्टाईल आणि मिनिमल मेकअप असा एकंदर सोनमचा लूक होता. 

सोनमचे हे फोटो पाहताच चाहत्यांनी त्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली. काहींनी तर तिची तुलना देवदूतांशी केली. फॅशनिस्ता म्हणून ओळख असणाऱ्या या अभिनेत्रीचं नवंकोरं फोटोशूट पाहता, गरोदरपणातही ती फॅशनपासून दूर आलेली नाही हेच स्पष्ट होत आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा.