Sonam Kapoor's Son Latest Photo: कितीही लपवलं तरी अखेर चाहत्यांना दिसली सोनमच्या मुलाची झलक...

Sonam Kapoor's Son Latest Photo: सध्या न्यू ईयरच्या (New Year 2023) निमित्तानं सगळेच सेलिब्रेटी आपला फॅमिली टाईम स्पेन्ड (Bollywood Celebs) करताना दिसत आहेत. त्यात अभिनेत्री सोनम कपूर (Actress Sonam Kapoor) हिनं आपल्या लाडक्या लेकाचा फोटोही शेअर केला आहे. ज्यात वायू (Vayu parents) आपल्या वडिलांच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेला दिसतो आहे, मग तुम्ही पाहिलात का हा क्यूट फोटो?

Updated: Jan 3, 2023, 01:34 PM IST
Sonam Kapoor's Son Latest Photo: कितीही लपवलं तरी अखेर चाहत्यांना दिसली सोनमच्या मुलाची झलक...  title=
Sonam Kapoor Son Latest Photo

Sonam Kapoor's Son Latest Photo: अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहूजा (Sonam Kapoor and Anand Ahuja) यांनी चार वर्षांपुर्वी तीन वर्षांच्या आपल्या रिलेशनशिपनंतर लग्न केले. गेल्याच वर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी आपल्या पहिल्या लाडक्या बाळाचे स्वागत केले. वायू कपूर (Vayu Kapoor) असं सोनम आणि आनंदच्या लाडक्या लेकाचं नावं त्यांनी ठेवलं आहे. गेल्या पाच वर्षांत बॉलिवूडमध्ये मोठ्या स्टार कीड्स बेबीचा (Bollywood Star Kids) जन्म झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंची एकच चर्चा पाहायला मिळते. करिना कपूरच्या तैमूरच्या (Taimur Ali Khan) जन्मानंतर तर स्टारकीड्सच्या चर्चांना कोण उधाण आलं होतं. करिनानं आपल्या लाडक्या लेकाचा चेहरा जगाला दाखवला तरी परंतु त्यानंतर अनेकदा सेलिब्रेटी हे आपल्या बाळांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड तर करू लागले परंतु त्यात त्यांनी त्यांच्या बाळाचा फोटोच अधिक लपवला. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची भरपूर नाराजी झाली. (bollywood actress sonam kapoor shares a loveable photo of her son vayu kapoor with husband anand ahuja)

आपल्या प्रायव्हसीबद्दल (Bollywood Celebs on Privacy) काटेकोर असलेले हे सेलिब्रेटी आपल्या बाळासोबतच्या क्यूट मोमेंट्स सोशल मीडियावर शेअर करत असले आणि त्या फोटोंना लाखो-करोडो लाईक्स मिळत असले तरी मात्र त्यांनी आपल्या प्रायव्हसीसाठी आपल्या नवजात बाळांचे फोटो लपवण्याचाच प्रयत्न केला. यातलं लोकप्रिय नावं म्हणजे विराट कोल्ही आणि अनुष्का शर्मा (Virat Kolhi and Anushaka Sharma Daughter Latest Photo). हा एकप्रकार ट्रेण्ड बनला आणि सर्वच सेलिब्रेटी मग नंतर हाच ट्रेण्ड फोलो करत राहिले आहेत. सोनमही त्याच ट्रेण्डला फोलो करते आहे. सध्या तिनं नुकताच आपल्या छोट्या बाळाचा फोटो शेअर (Sonam Kapoor Latest Photo on Instagram) केला आहे. ज्यात पापा आनंद अहूजा हे तान्ह्या वायूला कडेवर घेऊन मोकळ्या रस्त्यावर चालत आहेत. वायू झोपलेला दिसतो आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर उन्हाचे लोट आलेले दिसत आहेत. त्यामुळे हा फोटो थोडा लपवल्यासारखा वाटत असला तरी त्यात वायूचा चेहरा स्पष्ट दिसतो आहे. 

त्यामुळे सोनमनं आपल्या वायूचा चेहरा कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी तो चाहत्यांना बऱ्यापैंकी दिसतो आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सोनमनं असं लिहिलं आहे की, ''माझे हे दोघंही, माझं संपुर्ण जग आहेत. आपल्यासाठी आपलं मागील वर्ष हे खूप खास होते. तुम्हाला सगळ्यांना उशिरा विश करतेय पण सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आपलं आयुष्य हे दररोज खूप सुंदर वळणं घेत आहे. देवा, तुझे खूप आभार. मी माझ्या आयुष्याची कायम ऋणी आहे आणि आजपर्यंत मला माझ्या आयुष्यानं जे काही दिलं आहे त्यासाठीही मी ऋणी आहे. प्रत्येक दिवस हा खूपच खास आहे'', असं गोड कॅप्शनंही तिनं दिलं आहे.

हेही वाचा - Alexandra Dadarrio Photos: हॉलिवूड अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज; कपड्यांशिवाय स्विमिंगपूलमध्ये...

त्यांच्या या फोटोवर कौतुकचा वर्षाव होतो आहे. पापा आनंद आणि बेबी वायूचं बॉन्डिंग पाहूनही चाहते त्यांच्या लेव्हेबल रिलशेनशिपचं कौतुक करत आहे. फोटोतल्या वायूचा निरागस शांत आणि गोंडस चेहरा पाहून चाहते त्याच्या क्यूटनेसवरही ते प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा फोटो डेहरादून येथील आहे. सध्या सोनम आपल्या पती आणि मुलासोबत फॅमिली वेकेशन एन्जॉय करताना दिसते आहे.